कुडाळ पोलिसांची मुंबई मटका घेणाऱ्या वर धाड

रोख रक्कमसह मुद्देमाल आला पकडण्यात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल…

कुडाळ प्रतिनिधी 

अवैद्य धंद्यांवर कारवाई करा असे सक्त आदेश पोलीस अधीक्षक यांनी दिल्यानंतर कुडाळ पोलिसांनी पिंगुळी येथे मुंबई मटका घेणाऱ्यावर धाड टाकली. या धाडीमध्ये रोख रक्कम १४ हजार २७० सह मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला याप्रकरणी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. 

कुडाळ पोलिसांनी पिंगळी येथील वायमन गार्डन तिथे येतील वक्रतुंड जनरल स्टोअर्स च्या बाजूला मुंबई मटका घेणाऱ्यांवर धाड टाकली स्वतःच्या आर्थिक फायदा करिता सार्वजनिक ठिकाणी मुंबई मटका जुगार खेळला जात होता. या प्रकरणी सावंतवाडी आरोंदा बांधवाडी, सध्या राहणार पिंगुळी म्हापसेकर तिठा येथील २६ वर्षीय प्रथमेश राघोबा विरनोडकर व सावंतवाडी येथील खलील वाडीकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला हा मटका खेळत असताना १४ हजार २७० रुपयांची रोख रक्कम व मुद्देमाल आढळून आला ही कारवाई पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.