कुडाळ पोलीस ठाण्यात आले प्रकरण; दोन्ही महिला एकामेकाच्या शेजारी प्रकरण आले मिटवण्यात
कुडाळ | प्रतिनिधी
अक्कलकोट वरून वेंगुर्ले येथे जाणाऱ्या एसटी बस मध्ये पिंगुळी मधील दोन महिलांमध्ये सीटवर बसण्यावरून मारामारी झाली हे प्रकरण कुडाळ पोलीस ठाण्यात आले त्यानंतर हे प्रकरण दोन्ही महिलांनी मिटवले.
पिंगुळी येथील एक महिला अक्कलकोट वेंगुर्ले या बस मधून सोलापूर येथून पिंगुळीपर्यंत येत होती कुडाळ एस. टी. बस स्थानक येथे ही बस आल्यावर त्या ठिकाणी पिंगुळी येथील एक महिला बसमध्ये चढली त्यानंतर सोलापूर वरून पिंगुळीला जाणाऱ्या महिला महिलेच्या बाजूला आल्यावर सीटवर बसण्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झाली. ही बाचाबाची हाणामारी पर्यंत गेली. दोन्ही महिलांमध्ये फ्री स्टाईल झाली प्रवाशांनी सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणी ऐकले नाही. त्यानंतर ही बस कुडाळ पोलीस ठाणे येथे आणण्यात आली दोन्ही महिलांचे पोलीस ठाण्यात म्हणणे ऐकण्यात आले या दोन्ही महिला पिंगुळी येथील असून एकमेकांच्या जवळ राहतात अखेर या महिलांनी हे प्रकरण मिटवले
