चोरी व गहाळ झालेले मोबाईल मिळवून देण्यात कुडाळ पोलीसांची कामगिरी कौतुकास्पद

पोलीस अधीक्षक यांच्याकडून कुडाळ पोलीस ठाण्याचे करण्यात आले कौतुक

 

कुडाळ | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग पोलीस अधीक्षकांकडून जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यासाठी सीईआयआर पोर्टल अंतर्गत स्पेशल ड्राईव्ह देण्यात आला होता. यामध्ये कुडाळ पोलीस ठाण्याने चोरी व गहाळ झालेले १५ मोबाईल मिळवण्यामध्ये यश मिळवले सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस ठाण्याने ही कामगिरी चांगली केल्यामुळे त्यांचे कौतुक पोलीस अधीक्षक दहिकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन करण्यात आले.

अनेकांचे मोबाईल चोरीला तसेच गहाळ होतात आणि याच्या तक्रारी प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये दाखल होतात हे मोबाईल मिळण्याची आशा तक्रारदार सोडतो. पण हे मोबाईल तक्रारदाराला मिळाले पाहिजेत म्हणून सिंधुदुर्ग पोलिसांनी १६ मे ते ३० मे पर्यंत सीईआयआर पोर्टल अंतर्गत स्पेशल ड्राईव्ह घेण्यात आला. यामध्ये कुडाळ पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस पद्मिनी मयेकर यांनी २०२४ पासून चोरी व गहाळ झालेले मोबाईल शोधून काढण्यात यश मिळवले १५ दिवसांमध्ये १५ मोबाईल मिळवण्यात आले हे मोबाईल तक्रारदारांना देण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ पोलीस ठाण्याने या केलेल्या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक दहिकर यांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम व महिला पोलीस पद्मिनी मयेकर यांचे प्रमाणपत्र देऊन कौतुक केले.