शहरातील स्मशानभूमीमध्ये करण्यात आले वृक्षारोपण
कुडाळ | प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
दिवसेंदिवस पर्यावरणाचा होणारा -हास रोखण्यासाठी शासनाने विविध माध्यमातून वृक्षारोपण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले. या शासनाने दिलेल्या आदेशानुसार कुडाळ नगरपंचायतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त केळबाईवाडी येथील स्मशानभूमी, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील स्मशानभूमी व लक्ष्मीवाडी येथील सार्वजनिक स्मशानभूमीमध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर, मुख्याधिकारी अरविंद नातू, नगरसेविका चांदणी कांबळी, अधीक्षक राजू पठाण, पाणीपुरवठा अधिकारी रसिका नाडकर्णी, आरोग्य विभागाचे अधिकारी पांडुरंग नाटेकर, कर अधिकारी दत्ताराम म्हाडेश्वर, पाणीपुरवठा लिपिक संजय हेरेकर आदी उपस्थित होते.
