Thursday, December 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांनी केली पाट केंद्र शाळेची पाहणी

आमदार निलेश राणे यांनी केली पाट केंद्र शाळेची पाहणी

आमदार निलेश राणे यांनी केली पाट केंद्र शाळेची पाहणी…! तात्काळ उपाय योजना करण्याचे अधिकाऱ्यांना दिले निर्देश…!!

 

कुडाळ | प्रतिनिधी

पाट येथील जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेचे नुकसान होऊन या शाळेचे छप्पर कोसळल्याचे समजल्यावर आमदार निलेश राणे यांनी या शाळेची पाहणी केली आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी तातडीने आवश्यक असणारी उपाययोजना करण्याचे निर्देश शिक्षण व बांधकाम विभागाला दिले.

कुडाळ तालुक्यातील पाट येथे असलेली केंद्र शाळा पावसामुळे नादुरुस्त झाली या शाळेचे छप्पर कोसळले लवकरच शाळा सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना अध्यापन करणे कठीण होणार आहे. ही बाब आमदार निलेश राणे यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी या केंद्र शाळेला भेट देऊन त्याची पाहणी केली. यावेळी गटशिक्षणाधिकारी किंजवडेकर यांच्यासह इतर अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी तातडीचे आवश्यक असणारे उपाय योजना करण्याचे निर्देश दिले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, उपनेते संजय आंग्रे, सरचिटणीस दादा साईल, सरपंच साधना परब, माजी सरपंच समाधान परब, उपसरपंच समीर धुरी, शाळा व्यवस्थापन कमिटीचे नारायण साटम, ॲड. रुपेश देसाई तसेच कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, ओरोस तालुका प्रमुख दीपक नारकर आदी उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!