Tuesday, July 14, 2026
Google search engine
Homeआपलं कोंकणविद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य उत्तम संस्कार व चरित्र घडवणाऱ्या सरस्वतीच्या पावन मंदिरात नवगतांचे...

विद्यार्थ्यांचे उज्वल भविष्य उत्तम संस्कार व चरित्र घडवणाऱ्या सरस्वतीच्या पावन मंदिरात नवगतांचे सहर्ष स्वागत…

दिनांक 16 जून 2025 पासून शालेय नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात होत आहे शासकीय प्राथमिक माध्यमिक शाळा मध्ये विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी शिक्षणाची गोडी निर्माण व्हावी तसेच शिक्षणापासून कोणीही वंचित राहू नये शाळेबद्दलचे आस्था अधिक वाढावी याकरता नवगत विद्यार्थ्यांचे थाटामाटात तसेच मोठ्या उत्साहात स्वागत केले जाते आणि खऱ्या अर्थाने शाळेचा पहिला दिवस आनंददायी अविस्मरणीय ठरतो.

नव्याने प्रवेश घेणाऱ्या बालकांचे पुष्पगुच्छ, गोड खाऊ देऊन त्यांना एकत्रित ओवाळून तर वाजत गाजत शाळेत प्रवेश देत स्वागत केले जाते.मोफत पाठ्यपुस्तके आणि गणवेश यांचे वाटप असे उपक्रम राबवण्यात येतात.

. शाळेतला पहिला दिवस म्हणजे नवीन दप्तर, नवीन पुस्तके, नवा वर्ग, नवीन मित्र मैत्रिणी, नवीन शिक्षक… त्याचबरोबर नव्या शाळेत उज्वल भविष्याची स्वप्न घेऊन आईच्या पदराआड लपत शपथ येणाऱ्या मुलांमधील एक गोड मुलीचे चित्र रंगीत खडूच्या माध्यमातून शाळेच्या दर्शनी फलकावर रेखाटण्याचा प्रयत्न कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी. सय्यद कनिष्ठ महाविद्यालय सावंतवाडी येथील कलाशिक्षक श्री. केदार टेमकर यांनी साकारण्याचा प्रयत्न केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!