Friday, July 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळशिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला सेनेच्या वतीने मालवण मधील...

शिवसेना पक्षाच्या स्थापना दिवसानिमित्त सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेना महिला सेनेच्या वतीने मालवण मधील अनाथ मुलींच्या वसतिगृहाला जीवनावश्यक साहित्य भेट

कुडाळ | प्रतिनिधी 

शिवसेना पक्षाचा स्थापना दिवस सगळीकडे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. शिवसेना मुख्य नेते एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कुडाळ-मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून आणि जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली सिंधुदुर्ग जिल्हा महिला सेनेच्या वतीने महिला सेना जिल्हाप्रमुख सौ. दिपलक्ष्मी पडते यांच्या माध्यमातून पक्षाच्या स्थापना दिवसाच्या निमित्ताने विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले.

या निमित्ताने महिला रुग्णालय, कुडाळ येथे महिला रुग्णांना फळे वाटप तसेच मालवण शहरातील फातिमा कन्व्हेंट या अनाथ मुलींच्या वसतिगृहात आवश्यक असणारे बेडशीट, अन्नधान्य तसेच अन्य जीवनावश्यक साहित्य भेट दिले.

यावेळी सौ. दिपलक्ष्मी पडते यांनी या वसतिगृहातील सर्व मुलींशी आस्थापूर्वक चौकशी करत त्यांच्या अडीअडचणी समजून घेतल्या आणि आगामी काळात आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून या वसतिगृहातील मुलींना चांगल्या सुखसोयी मिळवुन देण्याचे आश्वासन दिले. हे वसतिगृह चालवणाऱ्या सिस्टर अनिता यांनी या प्रकल्पाची माहिती देते महिला सेनेच्या उपक्रमा बद्दल कौतुक करत त्यांचे आभार मानले.

यावेळी शिवसेना महिला सेना जिल्हाप्रमुख सौ. दीपलक्ष्मी पडते, युवतीसेना जिल्हाप्रमुख सोनाली पाटकर, जिल्हा समन्वयक अंजना सामंत, तालुकाप्रमुख मधुरा तुळसकर, तालुका समन्वयक कविता मोंडकर, उपतालुकाप्रमुख प्रियांका मेस्त्री, प्रियांका कुमावत, गीता नाटेकर, अल्पसंख्याक शहराध्यक्षा मार्टिन फर्नांडिसर, श्मी तुळसकर, शुभांगी परब, रिया कुबल, लुड्डीन फर्नांडिस, शीला लाड, कुडाळ नगरसेविका श्रुती वर्दम, रेवती राणे आणि इतर महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!