Tuesday, November 11, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळमाजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा !

माजी खासदार विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करा !

शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी कुडाळ युवासेनेकडून पोलिसांकडे निवेदनाद्वारे मागणी 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल ठाकरे सेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांनी आक्षेपार्ह विधान आपल्या मुलाखतीत केले. एकनाथ शिंदे हे नपुंसक राजकारणी आहेत. विनायक राऊत यांनी केलेल्या या विधानाचा कुडाळ युवासेनेकडून निषेध व्यक्त केला. तसेच या प्रकरणी विनायक राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी कुडाळचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. यावेळी कुडाळ युवासेना तालुकाप्रमुख सागर वालावलकर, उप विधानसभा प्रमुख चेतन पडते, युवासेना तालुका सचिव साई दळवी, विश्वास पांगुळ, स्वरूप वाळके, लवू कदम, प्रसन्न्न गंगावणे मुन्ना दळवी, वैभव मेस्त्री, प्रथमेश परब, विनोद सावंत, जागृत परब, भूषण गावडे आदी युवासेना पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!