कुडाळ | प्रतिनिधी
मुंबई गोवा महामार्गावरील कुडाळ सांगिर्डेवाडी येथे कंटेनर व स्कूटरमध्ये झालेल्या अपघातामध्ये स्कूटरचा चक्काचूर झाला. या अपघातात स्कूटरवर असलेल्या दोन्ही महिला जखमी झाल्या यामध्ये आकेरी परबवाडी येथील प्रणाली परब (वय २६) व सावंतवाडी येथील अक्षता लांबर- पाटील (वय २५) यांचा समावेश आहे. तसेच कंटेनरचा चालक ही किरकोळ जखमी झाला कंटेनर स्लिप झाल्यामुळे हा अपघात झाला असल्याचा अंदाज पोलिसांनी लावला आहे.
कुडाळ येथील आरएसइटीआय या ठिकाणी आकेरी येथील प्रणाली परब व अक्षता लांबर- पाटील या शिवण प्रशिक्षणा तसाठी आल्या होत्या प्रशिक्षण संपल्यानंतर सायंकाळी त्या स्कूटरने आपल्या घरी जात होत्या. सायंकाळी कुडाळ मध्ये किरकोळ पाऊस कोसळला होता त्या स्कूटर घेऊन महामार्गावर आल्यानंतर सावंतवाडीच्या दिशेने जात असताना त्यांच्या मागावून कंटेनर त्याच दिशेने जात होता दरम्यान कंटेनर स्लिप झाला आणि त्याने स्कूटरला धडक दिली स्कूटरला धडक दिल्यानंतर स्कूटर वरील दोन्ही महिला रस्त्यावर फेकल्या गेल्या आणि कंटेनर सर्व्हिस रोडच्या दिशेने वळला त्यामध्ये स्कूटरचा चक्काचूर झाला अपघातात स्कूटर वरील दोन्ही महिला जखमी झाल्या तसेच कंटेनर चालक ही किरकोळ जखमी झाला या सर्वांना कुडाळ ग्रामीण रुग्णालय येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. उशिरापर्यंत अपघाताची नोंद पोलीस ठाण्यात झाली नव्हती महामार्ग वाहतूक नियंत्रक पोलीस घटनास्थळी दाखल झाल्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.
फोटो मुंबई गोवा महामार्गावर कंटेनर व स्कूटर मध्ये झालेल्या अपघातात स्कूटर चक्काचूर झाला


