Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळघोटगे गावात जि. प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी घेतला महत्वपूर्ण ठराव : ...

घोटगे गावात जि. प. शाळांतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी घेतला महत्वपूर्ण ठराव :  सरपंच चैताली ढवळ यांचा पुढाकार 

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ तालुक्यातील घोटगे गावची मासिक सभा आज सरपंच चैताली ढवळ यांच्या मुख्य उपस्थितीत ग्रामपंचायतीत पार पडली. या मासिक सभेमध्ये गावातील जि. प. शाळांमधील घटत जाणारी पटसंख्येबाबत चिंता व्यक्त करण्यात आली. तसेच शाळांची पटसंख्या वाढण्याच्या ददृष्टिकोनातून गावातील जी मुले हायस्कूल आणि शहराच्या ठिकाणी शिक्षणासाठी जातात त्या पालकांनी आपली मुले गावातील जि. प. शाळांमध्ये घातल्यास चालू आर्थिक वर्ष सन २०२५-२६ सालासाठीची त्यांची घरपट्टी माफ करण्यात येईल असा ठराव आजच्या मासिक सभेत घेण्यात आलेला आहे. घोटगे गावच्या सरपंच चैताली ढवळ यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून घोटगे गावचा नवा आदर्श जिल्ह्यात निर्माण झाला आहे. एकंदरीत यामुळे जि. प. शाळांची पटसंख्या वाढण्यास मदत होईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!