Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळवसोली पुलावर आलेल्या पाण्यातून माणगाव येथील अमित धुरी गेला वाहून

वसोली पुलावर आलेल्या पाण्यातून माणगाव येथील अमित धुरी गेला वाहून

कुडाळ | प्रतिनिधी

वसोली वीरवाडी कुत्रेकोंड येथील पुलावर आलेल्या पाण्यातून वाहून गेलेला माणगाव येथील ३० वर्षीय अमित मोहन धुरी या युवकाला शोधण्यासाठी स्थानिक ग्रामस्थ व एनडीआरएफ टीमने प्रयत्न केले मात्र तो अद्याप सापडून आलेला नाही या मध्ये माजी सैनिक असलेले ६३ वर्षीय सखाराम कानडे बचावले आहेत.

माणगाव धरणवाडी येथील ३० वर्षीय अमित धुरी व माणगाव डोबेवाडी येथील ६३ वर्षीय सखाराम कानडे हे दोघेही सोमवारी रात्री शिवापूरच्या दिशेने मोटरसायकलने जात होते ही मोटर सायकल वसोली वीरवाडी कुत्रेकोंड येथे गेल्यावर त्या ठिकाणी असलेल्या पुलावरील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेले. या मोटरसायकलवर असलेला अमित धुरी या पाण्यात वाहून गेला तर मोटरसायकलच्या मागे असणारे सखाराम कानडे हे यामधून बचावले ते अंधारामध्ये पाण्यातून पुलावर आले ही घटना समजल्यावर घटनास्थळी कुडाळ तहसीलदार वीरसिंग वसावे व पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम तसेच स्थानिक ग्रामस्थ दाखल झाले त्यानंतर स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने रात्री काही वेळ शोधा शोध करण्यात आली त्यानंतर सकाळी ६ वाजल्यापासून स्थानिक ग्रामस्थांनी अमित धुरी याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र तो सापडून आला नाही दरम्यान सकाळी १० वाजता एनडीआरएफची टीम दाखल झाली त्यांनी दुपारी २ वाजेपर्यंत शोध मोहीम घेतली त्यांना सुद्धा अमित धुरी सापडून आला नाही पाण्याचा असलेला प्रवाह त्यामुळे एनडीआरएफ टीमला शोध मोहीमला अडथळा मोठ्या प्रमाणावर आला त्यामुळे शोध मोहीम थांबवण्यात आली. या शोध मोहीमेत माणगाव पोलिस सखाराम भोई, पालव,कुडाळ तहसिलदार वीरसिंग वसावे, तलाठी अनिल राणे पोलिस पाटील ऋतुजा कडव, सरपंच अजित परब, कुडाळचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजेंद्र पालवे, माणगाव बिट अंमलदार सखाराम भोई ,पालव, मंडल अधिकारी रजनि ढवळ, तलाठी अनिल राणे, सुरज भांदिगरे ग्राम विकास अधिकारी अतुल कदम, परिसरातील पोलिस पाटील , कोतवाल, माणगाव उपसरपंच बापू बागवे, युवासेना अध्यक्ष योगेश धुरी, यांनी शोध मोहीमेत सहभाग घेतला. उद्या पुन्हा शोध मोहीम राबविण्यात येणार आहे.वसोली येथे कॉजवेला गार्डस्टोन नसल्यामुळे हा अपघात झाल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!