कुडाळ | प्रतिनिधी
प्रत्येकाला शतप्रतिशत आपला पक्ष वाढवण्याची मुभा आहे त्याप्रमाणे आमचा शिवसेना पक्ष सुद्धा वाढवण्यासाठी आम्ही शतप्रतिशत प्रयत्न करत आहोत पण महायुतीमध्ये कुठेही तडा जाणार नाही याची काळजी प्रत्येक कार्यकर्त्यांनी घेतली पाहिजे असे रोजगार हमी, फलोत्पादन, खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक नंबरचा पक्ष हा शिवसेना आहे असे सांगितले. पावशी येथे झालेल्या शिवसेना कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.
पावशी येथील शांतादुर्गा मंगल कार्यालयामध्ये शिवसेनेचा जिल्हास्तरीय कार्यकर्ता मेळावा झाला यावेळी रोजगार हमी फलोत्पादन खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले, उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे संपर्क मंत्री उदय सामंत, माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, संजू परब, उपनेते संजय आंग्रे, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, निता कविटकर, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, समन्वयक सचिन वालावलकर, कुडाळ नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, पावशी सरपंच वैशाली पावसकर बबन शिंदे रुपेश पावसकर, प्रसाद गावडे, राजा गावडे, सुरेश झोरे, सावली पाटकर, वर्षा कुडाळकर, कुडाळ तालुका प्रमुख विनायक राणे, ओरोस प्रमुख दीपक नारकर, मालवण शहर प्रमुख दीपक पाटकर, कुडाळ शहर प्रमुख ओंकार तेली, अशोक दळवी आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी रोजगार हमी योजना मंत्री भरतशेठ गोगावले यांनी सांगितले की, आपले नेते व महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्यावर काही जबाबदाऱ्या दिल्या आहेत भविष्यात होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या जबाबदाऱ्या आहेत ज्या कार्यकर्त्यांनी आमच्या निवडणुकीमध्ये रात्रंदिवस काम केले त्या कार्यकर्त्यांच्या निवडणुकीमध्ये आता आम्ही काम करणे गरजेचे आहे या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये महायुती मधून निवडणूक लढवली जाणार आहे पण काही ठिकाणी जर निवडणुका स्वबळावर लढवाव्या लागल्या तर आपली तयारी असली पाहिजे. त्यासाठी प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी काम करणे गरजेचे आहे या जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे दोन आमदार आहेत त्यामुळे या ठिकाणी शिवसेनेचा वाटा हा मोठा असणार आहे असे सांगून आपल्या महायुती शासनाने ज्या योजना राबवल्या आहेत त्या योजना जनतेपर्यंत घेऊन जाणे प्रत्येकाचे काम आहे जो प्रामाणिक काम करणार त्याला निश्चित त्याचा मोबदला मिळणार आहे नाराज होऊन काही होणार नाही पक्षासाठी काम केले पाहिजे. आम्ही गरिबांचे शेठ आहोत श्रीमंतांचे नाही घर मोठ असण्यापेक्षा मन मोठं असणे गरजेचे आहे पक्षामध्ये सातत्याने काम करत राहिला तर तुम्हाला संधी मिळणार आहे. असे सांगून एका जागेसाठी अनेक उमेदवार असतील पण त्या ठिकाणी प्रत्येकाने जुळवून घेऊन आपला उमेदवार निवडून आला पाहिजे यासाठी मेहनत घेतली पाहिजे तुम्ही ती मेहनत घेतला तर पुढील काळात तुम्हालाही संधी मिळू शकते पुढील काळात निवडणुका या महायुतीच्या माध्यमातून लढवल्या जाणार आहेत कारण महाराष्ट्रात आणि केंद्रात आपले सरकार आहे. अपवादात्मक काही ठिकाणी आपल्याला स्वबळावर निवडणुका लढवाव्या लागल्या तर त्याची तयारी सुद्धा प्रत्येकाने ठेवली पाहिजे पण सर्वांना एकत्र घेऊन जाण्याचा आपला प्रयत्न राहिला पाहिजे असे त्यांनी यावेळी सांगितले.
१०० टक्के का नाही उद्योग मंत्री उदय सामंत
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद जास्त आहे दोन आमदार शिवसेनेचे आहेत मग आपण शंभर टक्के जागा का मागू नये असे सांगून पक्ष वाढवण्याची जबाबदारी प्रत्येकावर आहे आणि त्या पद्धतीत आम्ही सुद्धा काम करत आहोत असे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी सांगून स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये कोणाला तिकीट द्यावे कोणाला देऊ नये याचे सर्वस्वी अधिकार हे पक्षाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत ते आम्हाला दिलेले नाहीत. शिवसेनेला किती जागा द्याव्यात भाजपला किती सोडाव्यात याबाबतही वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू आहे ज्या जिल्ह्यामध्ये शिवसेनेची ताकद आहे त्या ठिकाणी निश्चित शिवसेनेला जास्त जागा मिळतील त्यासाठी प्रत्येकाने पक्ष वाढीसाठी काम केले पाहिजे आणि आपला भगवा झेंडा फडकवला पाहिजे आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून पक्षाला ताकद मिळाली आहे ते जे काम करत आहे त्या कामाने अनेक जण शिवसेनेची जोडले जात आहेत आता आम्ही दशावतार कलावंतांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहोत असे सांगून गैरसमज निर्माण एकमेकात करू नका आपला पक्ष वाढला पाहिजे यासाठी प्रयत्न करा राज्यस्तरीय समन्वय समितीमध्ये मी सुद्धा आहे त्यामध्ये ज्या ठिकाणी आमदार शिवसेनेचा आहे त्या ठिकाणी ज्या समित्या होणार आहेत त्या समितीमध्ये ६० टक्के जागा या त्या पक्षाच्या आमदाराच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत तसेच नियोजन मध्ये सुद्धा सदस्यांची संख्या किती असावे याचे गणित दिलेले आहे त्यामुळे निधीचे वाटप सुद्धा त्याच पद्धतीने होणार आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना हा एक नंबरचा पक्ष आहे आणि प्रतिशत पक्ष करण्याचा अधिकार आम्हाला सुद्धा आहे असे त्यांनी या कार्यकर्ता मेळाव्यात सांगितले.
यांचं मराठीवरील बेगडी प्रेम आहे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर
हिंदी भाषा ही गेले अनेक वर्ष पाचवीपासून सुरू आहे पण आता ही हिंदी भाषा पर्यायी म्हणून ठेवण्यात आली आहे पण मराठी भाषेचे महत्व कमी करण्यात आलेले नाही. मराठी भाषा ही अनिवार्य आहे भाषेवरून राजकारण हे केवळ निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केले जात आहे जे कोणी राजकारण करत आहेत ते सत्तेत असताना मराठी भाषेची कार्यालय मुंबई बाहेर घेऊन जात होते ही सगळी कार्यालय पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत आणले मुंबईमध्ये अनेक प्रकल्प सुरू आहेत हे सगळं महायुतीच्या कार्यकाळात होत आहे महायुतीची सत्ता आहे पण या सत्ते एकमेका विरुद्ध भांडून चालणार नाही तर प्रत्येकाने युतीचा धर्म पाळला पाहिजे त्यात संघटनाही आपली मजबूत केली पाहिजे जो कोणी संघटनेचे काम करणार आहे त्याला भविष्यात संधी मिळणार आहे असे सांगून सिंधू रत्न योजनेचे नूतनीकरण करण्याचे काम सुरू आहे असे माजी शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले.
आमची स्पर्धा कुणाची नाही आमची स्पर्धा विकास कामांशी आमदार निलेश राणे
यावेळी आमदार निलेश राणे यांनी सांगितले की येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंत्री या ठिकाणी आले आहेत कार्यकर्ते पदाधिकारी यांना असणाऱ्या अडचणी त्या समजून घेणार आहेत असे सांगून या ठिकाणी शिवसेनेचे हे चित्र सहज उभे राहिलेले नाही त्यासाठी अनेकांना अंगावर घ्यावे लागले आहे त्यामुळे संघटना किती मजबूत आहे. हे दिसत आहे ही संघटना मजबूत करण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे आपला शिवसैनिक ज्या गावात जातो त्या ठिकाणी संघटना तयार करतो पण विरोधकाचा झेंडा सुद्धा शिल्लक ठेवत नाही अशा प्रकारे काम करतो आता विरोधक कमी राहिले आहेत आणि जे राहिले आहेत ते उद्योग मंत्री उदय सामंत यांचे ९० टक्के लाभार्थी आहेत ते कधीही या ठिकाणी येऊ शकतात असे सांगून आमची स्पर्धा कोणाशी नाही कामांमध्ये आम्ही स्पर्धा करतो काम जिंकलं पाहिजे. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये आपले नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आनंद द्यायचा असेल तर आपला भगवा झेंडा फडकला पाहिजे त्यामध्ये शिवसेना जिंकली पाहिजे त्यासाठी सर्वांनी मेहनत घेणे गरजेचे आहे आमच्या निवडणुकीमध्ये याच कार्यकर्त्यांनी रात्रंदिवस काम केलं आता त्यांच्या निवडणुकीमध्ये आम्हाला काम करणे क्रमप्राप्त आहे कार्यकर्ता काही मागत नाही पण आपण त्याला काही देणे गरजेचे आहे निवडणुकीच्या माध्यमातून त्यांना आपले सहकार्य करणे गरजेचे आहे त्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहोत असे आमदार निलेश राणे यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा सरचिटणीस दादा साईल यांनी केले तर आभार तालुकाप्रमुख दीपक नारकर यांनी मानले यावेळी मोठ्या प्रमाणावर प्रवेश सुद्धा घेण्यात आले.


