Monday, September 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळअपहार गुन्ह्या बद्दल पाहिजे असलेला आरोपी दिलीप राजाराम पाटील याच्या मुसक्या पुणे...

अपहार गुन्ह्या बद्दल पाहिजे असलेला आरोपी दिलीप राजाराम पाटील याच्या मुसक्या पुणे तळेगाव येथे सिंधुदुर्ग पोलिसांनी आवळल्या…

कुडाळ | प्रतिनिधी 

 

कुडाळ पोलीस ठाणे गु. र. नं. 241/2024, BNS कलम 316(5), 318(4), या गुन्ह्यामध्ये पाहिजे असलेला आरोपी दिलीप राजाराम पाटील वय वर्ष 32, रा. माझनाळ ता. पन्हाळा जि. कोल्हापूर हा पुणे तळेगाव एमआयडीसी येथे हुंडाई कंपनी परिसरामध्ये मिळून आला. त्यास योग्य त्या तजवीजीने चौकशी अंती ताब्यात घेऊन त्याला कुडाळ पोलीस ठाणे येथे वैद्यकीय तपासणी अंती हजर केलेले आहे. दिलीप राजाराम पाटील स्पंदन बँक मध्ये साल 2018 ते साल 2024 काम रिकव्हरी एजंट म्हणून काम करत होता. त्या दरम्यान लोन भरणाऱ्या बचत गट महिलांचे जानेवारी 2022 ते जुलै 2024 पैसे 6 लाख 57 हजार 785 एवढी रक्कम गोळा करून त्यापैकी 1 लाख 10 हजार एव्हढी रक्कम कर्जदार च्या अकौंटला भरली उरलेली 5 लाख 47 हजार 785 चा अपहार बद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    सदरची कारवाई पोलीस अधीक्षक मा मोहन दहिकर अप्पर पोलीस अधीक्षक हृषीकेश रावले, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सिंधुदुर्ग चे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, यांच्या मार्गदर्शनाखाली PSI/ अनिल हडळ , ASI/903 जामसंडेकर, HC/1001 जॅक्सन, PC/598 कांडर ( सर्व स्थानिक गुन्हे शाखा सिंधुदुर्ग ), Psi गणेश कराडकर (सायबर विभाग) यांनी केलेली आहे. सदर पुढील तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!