Friday, December 5, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडी*झाराप ते झिरो पॉईंटच का ? झिरो पॉईंट पासून महामार्ग हद्दीत असलेली...

*झाराप ते झिरो पॉईंटच का ? झिरो पॉईंट पासून महामार्ग हद्दीत असलेली सर्वच अनाधिकृत बांधकामे हटवा;भास्कर परब* 

*कुडाळ,7जुलै*

*झाराप ते झिरो पॉईंटच का ? झिरो पॉईंट पासून महामार्ग हद्दीत असलेली सर्वच अनाधिकृत बांधकामे हटवा;भास्कर परब* 

राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ ला संपादित क्षेत्रात अनेक शेतकऱ्यांनी शासनाच्या नुकसान भरपाईचा मोबदला घेऊनही पून्हा शासनाच्या संरक्षित जागेत आपलीच मालमत्ता असल्यागत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांच्या सर्व प्रकारच्या आशिर्वादाने पक्की बांधकामे उभारून अतिक्रमणे केलेली आहेत,मी गेली तीन चार वर्षे याबाबत संबंधित विभागाचे वेळोवेळी लक्ष वेधले परंतु प्रत्येक वेळी संबंधित अनाधिकृत बांधकाम मालकांना नोटीसा देण्यापलीकडे काहीच कारवाई झालेली नाही,१३ ऑगस्ट २०२४ रोजी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी व मी स्वतः रस्त्याच्या मध्यबिंदू पासून शासनाच्या अधिग्रहित क्षेत्रात नविन किती बांधकामे झाली आणि किती सुरु आहेत,यांची प्रत्यक्ष अंतराची मेजर टेप टाकून मोजणी केली होती,त्यावेळी राष्ट्रीय महामार्ग अधिग्रहित क्षेत्रात अनेक बांधकामे अनाधिकृत असल्याचे सिद्ध झाले तरी फक्त नोटीसा बजावण्या पलिकडे कोणतीही कारवाई केली गेली नाही, आणि नविन बांधकामे करण्याचे थांबले नाही,याला संपूर्ण अर्थकारणाचे सहकार्य राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांसोबत असल्यामुळेच ही बांधकामे झाली आहेत आणि होत आहेत,माझी सन्माननीय पालकमंत्री यांना विनंती आहे की एका ठराविक क्षेत्रातील बांधकामांसाठी निर्णय न घेता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ च्या अधिग्रहित क्षेत्रात करण्यात आलेली सर्व बांधकामे हटविण्याचे आदेश राष्ट्रीय महामार्ग विभागाला द्यावेत आणि त्याची सुरुवात झाराप झिरो पॉईंट पासूनच करावी,ही कारवाई होताना सर्व सामान्य ठराविकच बांधकामांवर कारवाई न करता अनाधिकृत सर्व बांधकामे काढून टाकावित, आणि त्यासाठी होणारा खर्च संबंधित इमारत मालकांकडून वसूल करण्यात यावा,

 

*भास्कर परब*

*माजी सरपंच तेर्सेबाबर्डे*

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!