झाराप तिठा ते झिरो पॉईंट वरील अनधिकृत बांधकाम हटवा – रुपेश बिड्ये
पालकमंत्री नितेश राणे यांचे वेधले लक्ष
*सिंधुदुर्ग,6जुले*
मुंबई गोवा हायवे एन एच 66 झाराप तिठा ते झिरो पॉईंट हायवे लगत संपादित केलेल्या जागेवर प्रशासन व बांधकाम विभाग यांच्या मदतीने संपादित जमिनीवर बांधकामे करण्यात येत आहेत त्यामुळे वारंवार अपघात होत आहेत वअनेक बळी गेले आहेत प्रशासन व बांधकाम विभागाला अद्याप जागआलेली नाही झाराप तिठ्यावरून चारा रेल्वे स्टेशन वेंगुर्ले माणगाव खोरेतील 36गावांना जोडणारा रस्ता असल्याने येणारी वाहतूक हीजास्त असते तसेचबाजूलाच शाळा व हायस्कूल असल्याने शाळेतील मुले ये-जा करीत असतात झाराप तिठा ही जागा मृत्यूचा सापळा म्हणून तयार झाला आहे यापूर्वी लोकप्रतिनिधी यांनी प्रत्यक्ष जागेवर येऊन तपासणी करून आश्वासन दिले होते तरीअद्यापही झाराप तिठायेथे सर्कल झाले नाही तरी अपघात टाळण्यासाठी संपादित हायवे लगत जमिनीवरील बांधकामे तात्काळ हटवण्यात यावी व झाराप तिठा येथे सर्कल बांधण्यात यावे या सर्कल मध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक करावे झाला पंचक्रोशीतील जनतेला न्याय मिळावा आतापर्यंत गेल्या पाच वर्षात महामार्गावर बंद झालेली 17 व नोंद न झालेले तेरा अपघात झाले आहेत अपघातात पाच जण मयत झाले आहेत तर आठ व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत याकडे बीड्ये यानी पालकमंत्री नितेश राणे यांचे लक्षवेधले.


