सिंधुदुर्ग | प्रतिनिधी
सावंतवाडी येथे घरफोडी करून पळालेल्या दोघांना स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी बेंगलोर येथे पकडले या दोघांनाही अटक करण्यात आली आहे.
दि. 09.07.2025 रोजी 22.00 ते दि. 10.07.2025 रोजीचे 06.00 मुदतीत न्यु खासकीलवाडा (ता. सावंतवाडी) येथे अज्ञात आरोपींनी श्रमविहार कॉलनी येथील घरामध्ये अनधिकृत प्रवेश करुन घरफोडीचा प्रयत्न केला. तसेच लक्ष्मीनगर येथील घरासमोरील एक मोटार सायकल व वेलनेस रिसॉर्ट समोरील मोटार सायकल व तेथील दोन मोबाईल चोरी करुन निघुन गेलेले होते. घटनास्थळी दोन पाळ कोयते मिळुन आलेले होते. यावरुन सावंतवाडी पोलीस ठाणेत गु. रजि. नं. 129/2025, भारतीय न्याय संहिता 2023 चे कलम 303(2), 305(ब), 331(3), 331(4), 62, 324(4), 324(5), 126(2) अन्वये गुन्हा दाखल करुन नमुद गुन्हयाचा तपास सांवतवाडी पोलीस ठाणे करीत होते. नमुद आरोपींचा शोध घेणेकामी पोलीस अधीक्षक यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करणेबाबत आदेश दिलेले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखा समांतर तपास करीत असताना संशयीत आरोपीत हे कोल्हापुर ते कर्नाटक असे प्रवास करुन बेंगलोर या ठिकाणी गेले बाबत स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथकाला गोपनीय माहिती समजून आली. त्याप्रमाणे पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखेचे विशेष पथक तात्काळ बेंगलोर राज्य कर्नाटक येथे रवाना केले.
दिनांक 12.07.2025 रोजी बेंगलोर इलेक्ट्रीक शहरातील कामासंद्रा भागात लपुन बसलेले दोन संशयीत इसम मिळुन आले त्यांना ताब्यात घेवुन सावंतवाडी पोलीस ठाणे येथे आणुन चौकशी केली असता संशयीतांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच नमुद संशयीतांकडे अधिक चौकशी करता ते सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील असल्याचे समजले. त्यांना सदर गुन्ह्याकामी अटक करण्यात आलेली आहे.
आरोपींतांना यापुर्वी महाराष्ट्र राज्यातील विवीध जिल्ह्यात ३० ते ३५ गुन्हयांमध्ये अटक करण्यात आलेली असुन महाराष्ट्र, गोवा व कनार्टक राज्यात ते अनेक गुन्हयात पाहिजे आरोपी असल्याचे निष्पन्न झालेले आहे.
नमुद दोन्ही आरोपी हे घरफोडी व चोरीचे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांनी संघटीत टोळीच्या मार्फतीने महाराष्ट्र गोवा व कर्नाटक राज्यात गुन्हा केल्याचे दिसुन येते. त्यामुळे नमुद दोन्ही आरोपीत यांना महाराष्ट्र राज्यासह इतर राज्यांकरीता त्यांचेकडील दाखल गुन्हयांत आवश्यकता असल्यास सिंधुदुर्ग पोलीस विभागाशी संपर्क करण्यास कळविण्यात आलेले असुन सदर गुन्हयांचा पुढील तपास सावंतवाडी पोलीस करीत आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर व अपर पोलीस अधीक्षक नवमी साटम, उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली तसेच पोलीस निरीक्षक प्रविण कोल्हे, श्री. अमोल चव्हाण, सहा. पोलीस निरीक्षक श्री. जे.ए. खंदरकर, पोलीस उपनिरीक्षक श्री. अनिल हाडळ, पोलीस हेडकॉन्स्टेबल- डॉमनिक डिसोझा, सदानंद राणे, बस्त्याव डिसोझा व जॅक्सन घोन्साल्वीस पोलीस अंमलदार प्रथमेश गावडे, धनश्री परब व युवराज भंडारी यांनी केलेली आहे.


