कुडाळ | प्रतिनिधी
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ, सुंदर बस स्थानक अभियानामध्ये मुंबई विभागामध्ये कुडाळ एस. टी. बस स्थानकाने तिसरा क्रमांक पटकावला आहे.
एस. टी. बस स्थानक स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर बस स्थानक अभियान सुरू केले आहे यावर्षी पहिले सर्वेक्षण जानेवारी ते मार्च २०२५ रोजी झाले या सर्वेक्षणाचा निकाल जाहीर करण्यात आला. प्रादेशिक विभागनिहाय अ, ब, क वर्गानुसार हे क्रमांक देण्यात आले आहे. मुंबई प्रदेश विभागात असलेल्या अ वर्ग दर्जाच्या बस स्थानकामध्ये कुडाळ एस. टी. बस स्थानक आले ७४ गुण प्राप्त करून तिसरा क्रमांक पटकावला आहे. पहिला क्रमांक रत्नागिरी (नवीन) एस. टी. बस स्थानक, दुसरा क्रमांक बोईसर या बस स्थानकांनी मिळवला आहे. १०० पैकी हे गुण देण्यात आले आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ एस. टी. बस स्थानक आणि हा तिसरा क्रमांक पटकावल्याबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. अशा प्रकारचे वर्षभरामध्ये चार सर्वेक्षण होणार आहेत. या चार सर्वेक्षणानंतर गुणांची सरासरी काढून अंतिम निकाल जाहीर केला जाणार असून त्यानंतर बस स्थानक स्वच्छ सुंदर ठेवणाऱ्या बस स्थानकांना पारितोषिक दिले जाणार आहे.


