कुडाळ | प्रतिनिधी
गांजा प्रकरणात अटक केलेल्या तिसऱ्या संशयित प्रितेश रोहिदास मसुरकर (वय ३२, रा. उभादांडा ता. वेंगुर्ला) याला दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे. या प्रकरणांमध्ये अजून काही जण असण्याची शक्यता असून मुख्य आरोपीपर्यंत पोहोचण्यासाठी पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.
कुडाळ शहरातील कविलकाटे रायकरवाडी येथील गांजा प्रकरणातील तिसरा आरोपी प्रितेश मसुरकर याला कुडाळ पोलिसांनी पकडले असता त्याच्याजवळ १५० ग्रॅम वजनाचा गांजा होता दरम्यान त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे या प्रकरणात अजून काही धागेदोरे सापडण्याची शक्यता असल्यामुळे ही पोलीस कोठडी मागण्यात आली आहे.


