कुडाळ | प्रतिनिधी
सिद्धिविनायक उर्फ पक्या बिडवलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट याची पुडा पोलिसांनी हद्दपारी केली आहे त्याला गोवा राज्यामध्ये सोडण्यात आले असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आले.
पक्या बिडवलकर खून प्रकरणातील मुख्य आरोपी सिद्धेश शिरसाट हा गेले अनेक दिवस न्यायालयीन कोठडीत होता त्याच्या जामीनासाठी अर्ज दाखल केला होता दरम्यान जिल्हा सत्र न्यायालयाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला मात्र त्याची हद्दपारी होणे बाकी होते सिद्धेश शिरसाट याची जामीनावर मुक्तता झाल्यावर कुडाळ पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि त्याची हद्दपारी केली गोवा राज्यांमध्ये त्याला सोडण्यात आले अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आले.


