Monday, June 22, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीशिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून चेंदवणकर कुटुंबाला घर दुरुस्ती साठी...

शिवसेना जिल्हा संघटक श्री.रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून चेंदवणकर कुटुंबाला घर दुरुस्ती साठी तात्काळ मदतीचा हात 

कुडाळ | प्रतिनिधी 

चेंदवण येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथील अनंत चेंदवणकर यांच्या घरावर झाड पडून नुकसान झाले त्यांना शिवसेनेचे संघटक रूपेश पावसकर यांच्या कडून आर्थिक मदत करण्यात आली.

चेंदवण डॉ. आंबेडकर नगर येथील श्री.अनंत चेंदवणकर यांच्या घरावर दि. २५ जुलै रोजी फणसाचे झाड पडुन घराचे मोठे नुकसान झाले आहे. अनंत चेंदवणकर व पत्नी यांना मुलबाळ नसुन अनंत हे अर्धांगवायू या आजाराने त्रस्त असल्याने जाग्यावर आहेत. सध्या कुटुंबाला घर दुरुस्तीसाठी तात्काळ मदतीची गरज असल्याचे शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांना समजताच शिवसेना जिल्हा संघटक रुपेश पावसकर यांच्या माध्यमातून अनंत चेंदवणकर यांच्या पत्नीकडे आर्थिक मदत देण्यात आली. यावेळी शिवसेना कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, शिवसेना माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, दशावतार राज्य कमिटी सदस्य देवेंद्र नाईक, शिवसेना नेरूर विभाग प्रमुख किशोर सावंत, युवासेना उपजिल्हाप्रमुख संदेश नाईक आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!