Friday, May 8, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळआमदार निलेश राणे यांचा प्राथमिक शिक्षकांकडून सत्कार

आमदार निलेश राणे यांचा प्राथमिक शिक्षकांकडून सत्कार

कुडाळ | प्रतिनिधी 

प्राथमिक शिक्षकांचे प्रश्न सरकार दरबारी मांडल्याने प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार करण्यात आला आणि हे प्रश्न येणाऱ्या अधिवेशनात मांडून शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळी केली. 

प्राथमिक शिक्षकांचे विविध प्रश्न सरकारी दरबारी मार्गी लागलेली नाही त्यामुळे शिक्षकांना काम करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे या संदर्भात प्राथमिक शिक्षकांनी आमदार निलेश राणे यांना निवेदन दिले होते या निवेदनाच्या आधारे आमदार निलेश राणे यांनी संबंधित विभागाशी चर्चा केली होती त्यातील काही प्रश्न मार्गी लागण्याच्या वाटेवर आहेत मात्र काही प्रश्न अजूनही सुटलेले नाही हे प्रश्न अधिवेशनात मांडावे आणि शिक्षकांना न्याय द्यावा अशी मागणी प्राथमिक शिक्षकांनी आमदार निलेश राणे यांच्याकडे केली तसेच त्यांचा सत्कार ही यावेळी केला. यावेळी प्राथमिक शिक्षक समितीचे शशांक आटक, सचिन मदने, श्री. गावडे, श्री. राणे आदी शिक्षक उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!