Friday, May 8, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीसिंधुरत्न समृद्ध योजनेच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमहाराष्ट्र शासनाची...

सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या फलनिष्पत्तीचे मूल्यांकन करण्यासाठी यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीमहाराष्ट्र शासनाची अंगीकृत संस्था समिती जिल्हा दौऱ्यावर…

*सिंधुदुर्ग,18*

 

 सिंधुरत्न समृद्ध योजनेच्या मूल्यमापन अभ्यानांतर्गत यशदा अधिकाऱ्याची प्राथमिक क्षेत्रीय भेट दिनांक २० ते २३ ऑगस्ट २०२५ या कालावधीत नियोजित केली आहे. सदर भेटीदरम्यान दिनांक २२ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या बरोबर सिंधुरत्न कार्यकारी समितीतील सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सदस्य सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रकल्प व्यवस्थापन कक्षातील अधिकारी सिधुरत्न समृद्ध योजनेच्या कार्यान्वित यंत्रणांचे प्रमुख मुल्यमापन अभ्यासांतर्गत सिधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व उपविभागांमध्ये तीन दिवसीय माहिती संकलन कार्यशाळा आयोजित करणे प्रस्तावित असल्याने संबंधीत उपविभागीय प्रांत अधिकारी उपविभागीय कार्यशाळांमध्ये तालुकानिहाय कार्यान्वीत यंत्रणांचे अधिकारी तमेच लाभार्थी यांचेशी चर्चा करावयाची असल्याने त्याचे नियोजन समजावून घेण्यासाठी सर्व तालुक्यांतील तहसीलदार गटविकास अधिकारी अथवा इतर सुयोग्य प्रतिनिधीच्या बैठकीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही उपक्रमांना क्षेत्रीय भेटी देण्यात येणार आहे

सदर भेटीसाठी यशदातून सुमेधगुर्जर तसेच सहकारी श्रीमती प्रशा दासस्वार (समन्वयक), श्री. अजित करपे (संशोधन अधिकारी), श्रीमती माधुरी गुंजाळ (प्रकल्प विशेषज्ञ) व श्रीमती सिद्धी मोलावडे (इंटर्न) हे उपस्थित राहणार आहेत. दरम्यान सिंधू रत्न योजनेबाबत राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी गंभीर दखल घेतली असून याबाबत जिल्ह्यातील कामाची पाहणी करून आढावा घेऊन याबाबतचा अहवाल अर्थमंत्र्यांना सादर करण्यात येणार आहे आणि त्यानंतरच या योजनेचे भवितव्य ठरणार असल्याचे आता बोलले जात आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!