Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीसेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे केलेले नियमबाह्य सेवा निलंबन पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये...

सेवाशक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघटनेच्या कर्मचाऱ्यांचे केलेले नियमबाह्य सेवा निलंबन पालकमंत्र्यांच्या आदेशान्वये मागे 

एसटी कर्मचारी व पदाधिकारी यांनी मानले पालकमंत्र्यांचे जाहीर आभार

 

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रा.प.महामंडळ विभागीय कार्यालयाकडून नऊ कर्मचाऱ्यांना नियमबाह्य पद्धतीने निलंबित करण्यात आले होते त्यासाठी सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष श्री संदेश सावंत साहेब यांच्या पाठपुराव्याने मा. श्री नीतेशजी राणे साहेब यांच्या कडे तक्रार करण्यात आली होती, त्याची योग्य ती दखल घेवून रा.प.महामंडळाचे महाव्यवस्थापक तसेच परिवहन मंत्री महोदय यांच्याशी चर्चा करून आज रोजी १९/०८/२०२५ रोजी कर्मचाऱ्यांवर केलेली निलंबनाची कारवाई ज्या अधिकाऱ्यांच्या सहीने करण्यात आली होती त्याच अधिकाऱ्यांच्या सहीने मागे घेण्यात आली. सेवा शक्ति संघर्ष एस टी कर्मचारी संघ सिंधुदुर्ग विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने पालकमंत्री तथा मत्स्य व बंदरे विकास मंत्री मा.श्री नीतेशजी राणे साहेब व मा. श्री संदेशजी सावंत साहेब यांचे आभार मानण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!