Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ येथील डॉन बॉस्को चर्चमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग

कुडाळ येथील डॉन बॉस्को चर्चमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ येथील डॉन बॉस्को चर्चमध्ये शॉर्टसर्किटमुळे आग लागली आणि या आगीमध्ये चर्चमधील खुर्च्या व अन्य साहित्य जळून राख झाले ही घटना समजल्यावर नगरपंचायतीच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशामक दलाला बोलावून ही आग आटोक्यात आणली. 

कुडाळ शहरातील डॉन बॉस्को चर्चमध्ये पहाटेच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे आग लागली या आगीमध्ये सुमारे दीडशे खुर्च्या जळून राग झाल्या तसेच इतर साहित्य सुद्धा जळून गेले चर्चमध्ये धूर येत असल्याचे नगरपंचायतीचे मुकादम दीपक कदम यांना समजल्यावर ते चर्चा ठिकाणी गेले तर चर्चमध्ये आग लागल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यांनी चर्चमध्ये असलेल्या व्यक्तींना बोलावून घेतले त्यानंतर तात्काळ कुडाळ नगरपंचायत व एमआयडीसी अग्निशामक दलाला बोलावून घेतले आणि ही आग विझविण्यात आली यावेळी घटनास्थळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, नगराध्यक्ष प्राजक्ता बांदेकर, गटनेता विलास कुडाळकर तसेच ख्रिस्ती बांधव, शहरातील नागरिक मोठ्या प्रमाणावर आले होते या आगीमध्ये मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!