Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडी*नझीर शेख यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार* 

*नझीर शेख यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार* 

महाराष्ट्र राज्य रेखाचित्र शाखा कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक आणि कोकण विभाग सचिव नझीर शेख यांचा महाड,जिल्हा रायगड येथे संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री जकी अहमद जाफरी यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. महाड येथे होणाऱ्या संघटनेच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनाच्या नियोजन करण्यासाठी कोकण विभागासह महाराष्ट्राच्या कोअर कमिटीची बैठक महाड येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय स्मारक सभागृहात आयोजित करण्यात आली होती. यावेळेस श्री दारुणकर नागपूर कोषाध्यक्ष श्रीमती वंदना परिहार विभागीय सचिव नरेंद्र महाडिक रायगड सरचिटणीस सुधीर गभने नागपूर, उपाध्यक्ष साळुंखे,

विनायक जोशी, श्रीमती स्वाती डोकबाने नाशिक श्रीमती दिपाली खोबरे औरंगाबाद सुपेकर अ.नगर

मुबंई हून आपटे, राठोड,नितीन चव्हाण आणि विभागातील सर्व जिल्ह्याचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

     करायला उत्तर देताना नजीर शेख म्हणाले हा सत्कार माझ्या जिल्ह्यातील तसेच जिल्ह्याबाहेरील माझे कर्मचारी मित्र जय मला नेहमीच संघटना कामात मदत करत असतात आणि समाजातील प्रतिष्ठित व्यक्ती जे संघटना प्रेमी आहेत संघटनेसाठी मला नेहमीच मदत करत असतात हा सत्कार त्यांचा आहे आणि त्यांच्या वतीने तो मी स्वीकारत आहे. संघटनेने माझा सत्कार करून माझ्या जबाबदारीत अजून वाढ केलेली आहे माझ्यावर संघटनेने टाकलेल्या विश्वासास पात्र ठरण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!