Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळपिंगुळी - पाट आणि पिंगुळी - मठ या रस्ता कामांत सार्वजनिक बांधकाम...

पिंगुळी – पाट आणि पिंगुळी – मठ या रस्ता कामांत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार – ठाकरे शिवसेनेचे माजी पं.स. सदस्य अतुल बंगे

कुडाळ : 

         पिंगुळी – पाट आणि पिंगुळी – मठ या रस्ता कामांत सार्वजनिक बांधकाम विभाग कुडाळ उपविभागाकडून मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या या दोन्ही रस्ता कामांवर पुन्हा खर्च करण्यात आला आहे. यात सुमारे 32 लाखाचा आर्थिक भ्रष्टाचार झाला असून याला सर्वस्वी सा.बां.चे उपअभियंता जबाबदार आहेत. या प्रकरणी त्यांची सखोल चौकशी होऊन कारवाई व्हावी. तसेच कुडाळ मधून त्यांची तात्काळ अन्यत्र बदली करण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे माजी पं.स. सदस्य अतुल बंगे यांनी पत्रकार परिषदेत केली. 

      कुडाळ एमआयडीसी येथे बुधवारी आयोजित पत्रकार परिषदेत अतुल बंगे बोलत होते. यावेळी ठाकरे शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, तालुकाप्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, विभाग प्रमुख गंगाराम सडवेलकर, युवासेना शहरप्रमुख संदीप म्हाडेश्वर आदी उपस्थित होते.

     श्री.बंगे म्हणाले, आपण कुडाळच्या सा.बां.विभागाकडे पिंगुळी – पाट आणि पिंगुळी – मठ या रस्ता कामां संदर्भात माहीती अधिकारात माहिती मागवली होती. हि माहीती देण्यास या खात्याने वेळ लावला, परंतू यातून धक्कादायक माहीती समोर आली आहे. पूर्वी झालेल्या रस्त्यांवरच पुन्हा खर्च घातल्याची गंभीर बाब उघड झाली आहे. रस्ते सुस्थितीत असतानाही खड्डे बुजविणे, झाडी तोडणे, दिशादर्शक फलक आदी कामांवर लाखो रूपये खर्च करण्यात आले आहेत. 2022 मध्ये दोन वर्षांपूर्वी ही कामे पूर्ण करून त्यावर खर्च करण्यात आला असून, पुन्हा याच रस्ता कामांवर खर्च करण्यात आला आहे. मे महिन्यात पिंगुळी – पाट रस्त्यावर 22 लाख 85 हजार 169 रूपये तर पिंगुळी – मठ रस्त्यावर 9 लाख 68 हजार 740 रूपये एवढा खर्च दाखवण्यात आला आहे. प्रत्यक्षात कामच न करता हा खर्च करण्यात आला आहे. ठेकेदाराला हि रक्कम अदाही करण्यात आली आहे. त्यामुळे यात सुमारे 32 लाखाचा अपहार झाला असून ठेकेदार नाममात्र असले तरी संबंधित उपअभियंताच याला जबाबदार आहे. त्यामुळे त्यांची इडी मार्फत चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे. कुडाळ तालुक्यातून त्यांची अन्यत्र बदली झालीच आमची मागणी आहे.कुडाळचा सार्वजनिक बांधकाम विभाग भ्रष्टाचाराचे कुरण बनला आहे. या रस्ता कामातील भ्रष्टाचाराबाबत आम्ही स्थानिक आमदार तसेच माजी आमदार वैभव नाईक यांनाही निवेदनाची प्रत दिली आहे. तसेच ठाकरे शिवसेनेचे आमदार वरून सरदेसाई यांच्या माध्यमातून आगामी हिवाळी अधिवेशनात आवाज उठविण्यात येणार आहे. तालुक्यातील अन्य रस्त्यांचीही माहीती घेऊन, त्याविरोधात आवाज उठविणार आहे. संबंधित उपअभियंत्याची संपूर्ण चौकशी होऊन, कारवाई होत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असा इशाराही यावेळी अतुल बंगे यांनी दिला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!