Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीअतिवृष्टीमुळे २० ऑगस्ट रोजी शाळांना जाहीर करण्यात आली सुट्टी 

अतिवृष्टीमुळे २० ऑगस्ट रोजी शाळांना जाहीर करण्यात आली सुट्टी 

सिंधुदुर्ग | प्रतिनिधी 

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी उद्या बुधवार २० ऑगस्ट रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर केली आहे याबाबत त्यांनी प्रसिद्ध पत्रक दिले आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये सद्यस्थिती मध्ये अतिवृष्टी होत असून ऑरेंज अलर्ट दिलेला आहे व पाटबंधारे विभागाकडून प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी अनिल पाटील यांनी सिंधुदुर्ग आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व दिनांक ०२/०८/२०१९ च्या शासन परिपत्रकान्वये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व सरकारी व खाजगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विना अनुदानित शाळा, सर्व आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये व आयुक्त व्यवसाय व प्रशिक्षण केंद्र यांच्या आस्थापनेवरील शैक्षणिक संस्था, औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांना दिनांक २० ऑगस्ट रोजी सुट्टी जाहीर केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!