Saturday, November 8, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडी*गणेश चतुर्थी निमित्त माजी सभापतीमंगेश तळवणेकर यांचेकडून शिधावाटप*

*गणेश चतुर्थी निमित्त माजी सभापतीमंगेश तळवणेकर यांचेकडून शिधावाटप*

सावंतवाडी, 24आँगस्ट

 

सन 1989 मध्ये शिवसेनेचा विभाग प्रमुख असल्यापासून गणेश चतुर्थीला कारिवडे गावातून दरवर्षी शिधावाटप करण्यास सुरुवात केली होती. आता वेगवेगळ¬ा गरजूंना शिधावाटप केले जाते. आज दि.24/08/2025 रोजी विठ्ठल मंदिर, सावंतवाडी येथे शेकडो अंधबांधवांना व गरजूंना तेल, तुरडाळ, साखर, गुळ, वाटाणे व अगरबत्ती वाटप करण्यात आले. यावेळी कारिवडे गावचे पुरोहीत समीर भिडे उपस्थित होते. संस्थेचे राष्ट्रीय दृष्टीहीन संघ, महाराष्ट्र, कोकण विभाग अध्यक्ष बाबुराव गावडे, सेक्रेटरी महेश आळवे व शेकडो अंधबांधव व गरजू उपस्थित होते. यासाठी विठ्ठल मंदिराची जागा विनामूल्य उपलब्ध करुन दिल्याबद्दल विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष अॅड.दिलीप नार्वेकर यांचे आभार मानण्यात आले.

उद्या सोमवार व मंगळवार या दिवशी आमच्याकडील यादीप्रमाणे इतर भागातील गरजूंना घरपोच शिधावाटप करण्यात येईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!