Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीपणदूर महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या विभागीय आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात यश

पणदूर महाविद्यालयाचे मुंबई विद्यापीठाच्या विभागीय आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात यश

कुडाळ येथील संत राऊळ महाराज महाविद्यालयामध्ये दिनांक २२ व २३ ऑगस्ट २०२५ रोजी संपन्न झालेल्या मुंबई विद्यापीठाच्या ५८ व्या विभागीय आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवात पणदूर येथील पद्मश्री बाबासाहेब वेंगुर्लेकर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध कलाप्रकारात सहभाग घेतला. यामधून टी वाय बीएस्सी आयटी वर्गातील विद्यार्थिनी कु. वेदिका चिंतामणी महाडेश्वर हिने काढलेल्या मेहंदी डिझाईनिंगला प्रथम क्रमांक प्राप्त झाला असून तिची मुंबई विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सव अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे . तर एसवाय बीबीआय वर्गातील विद्यार्थी कु. संतोष प्रमोद सुतार याची तालवाद्य या स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ म्हणून निवड करण्यात आली. या यशाबद्दल दादासाहेब शिरोडकर शैक्षणिक अकादमीचे अध्यक्ष मा. श्री. पुष्कराज कोले, उपाध्यक्ष मा.श्री. प्रकाश जैतापकर, कार्याध्यक्ष मा. डॉ. मोहन प्रभू ,सचिव मा. डॉ. अरुण गोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. राजेंद्र पवार सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. प्रांजना पारकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी कौतुक करून अभिनंदन केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!