आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे राहणार उपस्थित
कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातील शिवसेना पक्षाचा कार्यकर्ता मेळावा उद्या सोमवार दि. १५ सप्टेंबर रोजी कुडाळ येथील महालक्ष्मी हॉल येथे सकाळी ११ वाजता राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
कुडाळ येथे गृह (शहरे), महसूल ग्रामविकास व पंचायतराज अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत कुडाळ येथे शिवसेनेचा मेळावा होणार आहे. या मेळाव्याला माजी शिक्षण मंत्री व आमदार दीपक केसरकर, आमदार निलेश राणे, संपर्कप्रमुख रवींद्र पाठक, उपनेते संजय आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला सेना जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, युवा सेना जिल्हाप्रमुख संग्राम साळसकर यांच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा होणार आहे तरी सर्व शिवसैनिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


