कुडाळ | प्रतिनिधी
हिर्लोक व गिरगाव मध्ये उबाठा सेनेला खिंडार पडले आहे या भागातील उबाठाच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीमध्ये शिवसेनेत प्रवेश केला आहे.
उबाठा शिवसेनेला धक्क्यावर धक्के बसत आहेत. हिर्लोक, गिरगाव गावातील कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. हा प्रवेश केल्यानंतर गिरगाव उपशाखाप्रमुख म्हणून पद्मनाम गुरव तर हिर्लोक शिवसेना शाखाप्रमुख निनाद परब यांची निवड करण्यात आली आहे. या प्रवेशावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, उपजिल्हाप्रमुख अरविंद करलकर, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष दीपक नारकर, कुडाळ तालुकाप्रमुख विनायक राणे, विभाग प्रमुख नागेश आईर, गिरगाव माजी सरपंच अरुण आचरेकर, हिर्लोक माजी सरपंच उदय सावंत, माजी पंचायत समिती सदस्य आनंद भोगले, संजय परब, चंद्रकांत सावंत, मोहन परब, तुषार परब, सुशील तांबे, गजानन आचरेकर, दिवाकर कुसगावकर, सज्जन सावंत आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते


