तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालयातील व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना केले सायकलचे वाटप
कुडाळ | प्रतिनिधी
तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालयातील व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना सायकलचे वाटप आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आले हे सायकलचे वाटप नवी मुंबई वाशी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व उपशहर प्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने करण्यात आले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वाहतुकीची व्यवस्था उभी राहावी या हेतूने नवी मुंबई येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व शिवसेना उपशहर प्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने डिगस माध्यमिक विद्यालयातील १०० विद्यार्थ्यांना व तुळसुली विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय प्रशालेतील १०० विद्यार्थ्यांना मोफत सायकल वाटप आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजय पडते, महिला जिल्हाप्रमुख दीपलक्ष्मी पडते, जिल्हा सरचिटणीस दादा साईल, उपजिल्हाप्रमुख आनंद शिरवलकर, अरविंद करलकर, तालुकाप्रमुख विनायक राणे, माजी जिल्हा परिषद सदस्य अमरसेन सावंत, माजी पंचायत समिती सदस्य मिलिंद नाईक आदी उपस्थित होते.


