कुडाळ | प्रतिनिधी
आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धेचा पारितोषिक वितरण उद्या मंगळवार १६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वा. सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये होणार आहे अशी माहिती शहर प्रमुख अभि गावडे यांनी दिली आहे
आमदार निलेश राणे पुरस्कृत कुडाळ शहर शिवसेना आयोजित गणेश सजावट स्पर्धा घेण्यात आली होती या स्पर्धेमध्ये ९१ स्पर्धक सहभागी झाले होते स्पर्धेतून वार्ड निहाय प्रत्येकी ३ क्रमांक आणि शहरांमधून ४ क्रमांक काढण्यात आले. या स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा सिंधुदुर्ग राजाच्या दरबारामध्ये होणार आहे. या सोहळ्यासाठी आमदार निलेश राणे उपस्थित राहणार आहेत. तरी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांनी व विजेत्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन शहर प्रमुख अभी गावडे यांनी केले आहे.


