Friday, December 5, 2025
Google search engine
Homeताज्या घडामोडी*पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा रविवारी होणार शुभारंभ*

*पालकमंत्री चषक भजन स्पर्धेचा रविवारी होणार शुभारंभ*

*देवगड-कुणकेश्वर येथे तालुकास्तरीय स्पर्धा*

मालवण: 

भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गच्यावतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथम आठही तालुक्यामध्ये पालकमंत्री भजन चषक स्पर्धा आयोजित करण्यात आली असून या स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते रविवारी 26 ऑक्टोबर रोजी कुणकेश्वर मंदिरामध्ये होणार आहे. या स्पर्धेला सर्वांनी सहकार्य करावे आणि सहभागी व्हावे असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष संतोष कानडे, देवगड तालुका अध्यक्ष संदीप नाईकधुरे आणि श्री देव कुणकेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त मंडळ अध्यक्ष एकनाथ तेली यांनी केले आहे. 

प्रथम पारितोषिक 10 हजार 23, द्वितीय 5 हजार 23 आणि तृतीय पारितोषिक 3 हजार 23 एवढे ठेवण्ात आले असून उत्तेजनार्थ पारितोषिक 2 हजार 23 एवढे ठेवण्यात आले आहे. देवगड तालुकास्तरीय पहिलीच स्पर्धा असून या स्पर्धेसाठी श्री देव कुणकेश्वर मंदिर ट्रस्टचे विशेष सहकार्य आहे. भजन मंडळाबरोबरच वादक, गायक, तबला, कोरस यांनाही प्रत्येकी 1 हजार 23 रूपयाचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

देवगड तालुकास्तरीय स्पर्धा संपल्यानंतर पुढील तालुक्यांचे नियोजन करण्यात येणार आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भजनी कलाकार संस्था सिंधुदुर्गने यापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे जिल्हास्तरीय भजन स्पर्धा आयोजित केली होती आणि ती यशस्वीही केली होती. ही स्पर्धाही भजनी कलाकारांच्या सहकार्याने यशस्वी होईल असा विश्वास संतोष कानडे यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!