⚡ *न्यूज फ्लॅश*⚡
मुबंईत थरार !
*मी स्वत: किडनॅपर रोहित आर्यला चेकने पैसे दिले होते’, पवईतील अपहरणकर्त्याबद्दल दीपक केसरकरांचा मोठा खुलासा*
*मुंबईत 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्या किडनॅपरबद्दल माजी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी मोठा खुलासा केला आहे. त्याने शासनाच्या एका मोहिमेत पैसे लावले होते. पण त्याला आपण स्वत: चेकने पैसे दिल्याचा खुलासा केसरकर यांनी केला आहे.*
*मुंबईच्या पवई येथील 17 मुलांना एका स्टुडिओत ओलीस ठेवल्याच्या प्रकरणात आता मोठा खुलासा होताना दिसत आहे. आरोपी रोहित आर्य याने शासनाकडून 2 कोटी रुपये मिळाले नसल्याचा आरोप केले होता. यासाठी त्याने माजी मंत्री दीपक केसरकर हे शिक्षणमंत्री असताना उपोषण केलं होतं. त्याने आपले पैसे मिळाले नाहीत म्हणून मुलांना ओलीस ठेवण्याचं घृणास्पद कृत्य केलं. रोहित आर्यच्या या कृत्यानंतर दीपक केसरकर यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आपण रोहित आर्य याला स्वत: चेकने पैसे दिले होते, असा मोठा खुलासा दीपक केसरकर यांनी एका वृत्तवाहिनीला फोनवर प्रतिक्रिया देताना केला.*


