Friday, December 5, 2025
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकींना दोन...

कुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकींना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयातुन केले हद्दपार…!

कुडाळ पोलीस ठाण्याची विशेष कामगिरी….

 

कुडाळ | प्रतिनिधी 

कुडाळ पोलीस ठाण्याचे कार्यक्षेत्रातील दोन सराईत गुन्हेगार व एक मटका बुकींना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूर जिल्हयातून हद्दपार करण्यात आले आहे. यामध्ये कुडाळ येथील अनंत ऊर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर, पिंगुळी येथील सलीम सादीक सय्यद, कोलगांव येथील खलील हुसेन वाडीकर यांचा समावेश आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयातील नागरीकांचे जिवीताचे तसेच मालमत्तेस कोणत्याही गुन्हेगाराकडून धोका निर्माण होवु नये. नागरीकांना भयमुक्त असे वातावरणात राहता यावे. या करीता पोलीस अधीक्षक डॉ. श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कू. नयोमी साटम व सावंतवाडी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांनी कुडाळ पोलीस ठाण्याचे हद्दीत सतत गंभीर गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलीत करुन त्यांचेवर कडक कारवाई करण्याबाबतचे आदेश कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र मगदूम यांना दिलेले होते.

त्यानुसार पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम यांनी गेल्या काही वर्षात तसेच सद्यस्थितीत सतत गुन्हे करणारे गुन्हेगारांची माहीती संकलित केली. त्यानुसार कुडाळ पोलीस ठाण्याचे हददीतील घरफोडी चोरीचे ७ गुन्हे दाखल असणारा अभिलेखावरील सराईत गुन्हेगार अनंत ऊर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (वय ३२ वर्षे, रा. माठेवाडा, कुडाळ) तसेच वाहनाच्या बॅटऱ्या चोरी, गदीं मारामारीचे गुन्हे दाखल असलेला अभिलेखावरील ४ गुन्हे दाखल असलेला सलीम सादीक सय्यद (वय ३८ वर्षे रा. पिंगुळी गुढीपुर, ता. कुडाळ) तसेच अवैध मटका जुगाराचा खेळ खेळणारा व मटका जुगाराचे ४ गुन्हे दाखल असलेला मटका बुकी खलील हुसेन वाडीकर (वय ६१ वर्षे रा. कोलगांव, फणसवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) त्याचेविरुध्द हद्दपारीची कारवाई करण्याकरीता स्वतंत्र अहवाल कुडाळ उप विभागीय दंडाधिकारी यांचेकडे पाठविण्यात आलेले होते. त्यानुसार कुडाळ उपविभागीय दंडाधिकारी यांचे न्यायालयात सदर प्रस्तावाची सुनावणी होवुन नमुद सराईत गुन्हेगार अनंत ऊर्फ अक्षय अशोक म्हाडेश्वर (वय 32 वर्षे, रा. माठेवाडा, कुडाळ), सलीम सादीक सय्यद (वय 38 वर्षे रा. पिंगुळी गुढीपुर, ता. कुडाळ), खलील खलील हुसेन वाडीकर (वय ६१ वर्षे रा. कोलगांव, फणसवाडी ता. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग) यांना दोन वर्षाकरीता सिंधुदुर्ग सह लगतच्या रत्नागिरी व कोल्हापूर या तीन जिल्हयातुन हद्दपार करण्याचे आदेश पारीत करण्यात आलेले आहेत.

त्यानुसार नमुद गुन्हेगारांना हद्दपारीचे आदेशाची कुडाळ पोलीस ठाण्या मार्फत बजावणी करण्यात आलेली असुन नमुद आरोपी हे हद्दपारीचे कालावधीत गोवा राज्यात राहणार असल्याने त्यांना गोवा राज्यात पाठविण्यात आले, मटका बुकीला हद्दपार करण्याची कारवाई ही सिंधुदुर्ग जिल्हयातील पहिलीच कारवाई कुडाळ पोलीस ठाण्यामार्फत करण्यात आलेली आहे.

सदरची कारवाई ही पोलीस अधीक्षक डॉ श्री मोहन दहीकर, अपर पोलीस अधीक्षक कु. नयोमी साटम व सावंतवाडी उप विभागीय पोलीस अधिकारी श्री विनोद कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र मगदूम, पोलीस अंमलदार कृष्णा केसरकर, उषा आईर, सुजाता तेंडोलकर यांनी कारवाई केलेली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!