Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीना. नितेश राणे यांच्या वेंगुर्ला शहरात 2 दिवसात 10 प्रभागात कॉर्नर सभा...

ना. नितेश राणे यांच्या वेंगुर्ला शहरात 2 दिवसात 10 प्रभागात कॉर्नर सभा संपन्न

वेंगुर्ला

   वेंगुर्ला नगरपरिषद साठी आम्ही पुन्हा एकदा प्रशासकीय कामातील अनुभवी राजन गिरप, सुहास गवंडळकर, शितल आंगचेकर यांच्यासारखे हुशार व अन्य 18 सुशिक्षित उमेदवार निवडणूक रिंगणात उतरविले आहेत. भाजपाचे कार्य जनतेसमोर न्या व त्यांच्या पाठीशी भक्कम उभे राहून निवडून द्या.पुढील विकास करण्यास मी सज्ज राहीन, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केली.

    प्रचारास कमी कालावधी शिल्लक असतानाही पालकमंत्री ना. नितेश राणे यांनी वेंगुर्ला शहरात 2 दिवसात सर्व दहाही प्रभागात कॉर्नर सभा घेत मार्गदर्शन केले. भाजपच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्यासाठी सहकार्य करा, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, तालुकाध्यक्ष पप्पू परब,थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिलीप गिरप, उमेदवार विनायक ( सुहास ) गवंडळकर, गौरी मराठे, शीतल आंगचेकर, प्रणव वायंगणकर, युवा मोर्चाचे पदाधिकारी हेमंत गावडे, प्रसाद पाटकर यांच्यासह, अन्य प्रभागातील उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते. बऱ्याच प्रभागात या बैठकाचे आयोजन जलदगतीने करण्यात आले असून नागरिकांची उपस्थितीही लक्षणीय मिळाली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!