Thursday, August 20, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीपरमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन 

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या समाधीस्थळी मंत्री नितेश राणे घेतले दर्शन 

परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त घेतले दर्शन

भक्तांशी , विक्रेत्यांशी साधला संवाद ; संस्थानच्या पदाधिका-यांची घेतली भेट 

 

कणकवली :

कणकवली येथील योगीराज परमहंस भालचंद्र महाराज यांच्या ४८ व्या पुण्यतिथी निमित्त प.पु.भालचंद्र महाराज समाधी स्थळी पालकमंत्री नितेश राणे यांनी दर्शन घेतले.यावेळी आपल्या कणकवली मतदारसंघातील सर्वसामान्य जनता सुखी , समृध्द राहो असे गाऱ्हाणे घातले. भक्तांशी , विक्रेत्यांशी संवाद साधला.

भालचंद्र महाराज यांच्या पुण्यतिथी दिनानिमित्त संस्थानमध्ये २३ ते २७ नोव्हेंबर दरम्यान पुण्यतिथी महोत्सव आयोजित करण्यात आला. विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा करण्यात आलेल्या या पुण्यतिथी महोत्सवाच्या आज सांगता सोहळ्याच्या निमित्त पालकमंत्री नितेश राणे यांनी उपस्थित राहून समाधीचे मनोभावे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. यावेळी भाजपा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समीर नलावडे , तालुकाध्यक्ष मिलींद मेस्त्री , संस्थानचे अध्यक्ष श्री.कामत , व्यवस्थापक विजय केळुस्कर, गजानन उपरकर, संतोष कानडे, राजन परब, राज नलावडे आदींसह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!