Friday, May 8, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीनिवडणुक सावंतवाडी नगरपरिषदेची...

निवडणुक सावंतवाडी नगरपरिषदेची…

गोष्ट आहे जिंकण्यासाठी बळ देत असलेल्या युवा नेतृत्व विशालभाई परब यांच्या तरुणांमधील वाढत्या क्रेझची!

  • विशालभाईंना भक्कम साथ मिळते आहे वेदिकावहिनींच्या महिलांमधील प्रभावाची!
  • तो आला.. त्याने पाहिलं.. आणि त्याने जिंकलं…!
  • हजारो युवांची हृदये जिंकण्यासाठी त्यांच्या वेदना समजून घेणारे नेतृत्व हवे होते जे अथक संघर्षातून ते इथे उभे राहिले होते!

 

हा योगायोग नव्हता…!

कालपर्यंत शून्यात असलेला एक युवक जिद्दीने आपले व्यावसायिक साम्राज्य उभे करत होता! पण… त्याचे अर्थकारण स्वतःच्या स्वार्थासाठी नव्हते तर युवकांना मदतीचा हात देण्यासाठी होते. गोरगरीब जनतेच्या अडचणीत मदतीला पुढे धावण्यासाठी होते.

जनतेच्या मनात तो रुजला! वाढला! आज त्याला संपवण्यासाठी प्रत्येक विरोधक प्रत्येक सभेत त्याच्यावर टीका करत आहे! खोट्यानाट्या आरोपांची गरळ ओकत आहे! पण तरीही… सामाजिक संवेदनाच्या शुद्ध बीजातून उगवलेले एक रोपटे दिवसेंदिवस अधिकच विशाल होत आहे. राजकारण असो किंवा समाजकारण… सेवाधर्माच्या अखंड व्रताप्रमाणे चालवत आहेत! प्रत्येक गोरगरीब जनतेच्या, युवकाच्या मनात उगवलेला हा भविष्याच्या आशेचा आणि नव्या दिशेचा विशाल वटवृक्ष आहे भाजपा महाराष्ट्रचा युवा नेता आदरणीय विशाल प्रभाकर परब! 

प्रत्येकाच्या मनात विशालभाई बद्दल एकच भावना आहे – हा आपला माणूस आहे! आपले भविष्य घडवण्याची ताकद असलेला हा युवा नेता आहे! 

राजकारणात विशालभाईंच्या स्वप्नांना साथ द्यायला आता सौ वेदिकावहिनी पुढे आल्यात! महिला वर्गात त्यांच्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव फार मोठा आहे! दोघांचाही स्वभाव माणसांना जोडणारा… आकाशाएवढी स्वप्ने जिंकूनही जमिनीशी नाते जोडणारा! दोघांनाही वेड फक्त विकासाचे! वेध जनतेच्या आमुलाग्र परिवर्तनाचे! आणि जिद्द प्रत्येक संघर्षाला भिडून यश खेचून आणण्याची!

सातत्याने मागील काही महिन्यात स्वतःला त्याने सिद्ध केलंय! सोनं संघर्षाच्या भट्टीत तावून सुलाखून पुन्हा नव्याने चमकून उठलं आहे!

ही क्रेझ आहे त्या सोन्याच्या तेजाची! आज हजारो युवक विशालभाईंवरून जीव ओवाळून टाकण्यास सज्ज आहेत. महिला वर्गात तीच क्रेझ सौ. वेदिकावहिनींची आहे. या दे धडक बेधडक दाम्पत्याचे नेतृत्व ही सावंतवाडीचीच नाही तर पूर्ण कोकणची नवी आशा आहे. 

नक्की आहे की येणाऱ्या काळात फार मोठा बदल दिसणार… विश्वास आहे, कोकण प्रसन्नतेने हसणार!

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!