Friday, May 8, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीदिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की तथ्यांवर आधारित अचूक रिपोर्टिंगला बदनामी मानता...

दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की तथ्यांवर आधारित अचूक रिपोर्टिंगला बदनामी मानता येत नाही.

न्यायधारा 222/2025

 

*दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की तथ्यांवर आधारित अचूक रिपोर्टिंगला बदनामी मानता येत नाही*.

Justice Neena Bansal Krishna यांनी पत्रकाराच्या विरोधातील 2010 मध्ये Time Magazine मध्ये प्रकाशित लेखाबाबत दाखल केलेला बदनामीचा खटला रद्द केला. 

फिर्यादीने 2014 मध्ये तक्रार दाखल केली होती, असा आरोप करत की लेखात त्यांच्या व त्यांच्या NGO विरुद्ध मनी लॉन्डरिंगसंबंधी अप्रत्यक्ष सूचनांनी बदनामी केली. मात्र न्यायालयाने म्हटले की लेखात आरोप केल्याचे किंवा फिर्यादी यांना तपासात आरोपी ठरवल्याचे काहीही लिहिले नव्हते; लेखातील माहिती तथ्याधारित होती.

 

*न्यायालयाचे निष्कर्ष:* 

👉लेखातील मजकूर तथ्यात्मक असल्याने बदनामी होत नाही.

👉अप्रत्यक्ष सूचनांचा अतिसंवेदनशील अर्थ लावून बदनामीचा खटला करता येत नाही.

👉 फिर्यादीला लेखाची माहिती 2010 पासून होती, तरी 2014 मध्ये तक्रार दाखल केली, त्यामुळे खटला कालबाह्य (barred by limitation) आहे.

👉त्यामुळे पत्रकाराविरुद्ध कोणताही बदनामीचा गुन्हा सिद्ध होत नाही.

⚖️अखेरीस आरोपी पत्रकाराला पूर्णतः मुक्त केले आणि त्यांच्यावरील फौजदारी बदनामीच्या कारवाई रद्द केली.

– ms. nilanjana bhowmick v. ravi nair

– नि. ता. 17.11.2025

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!