कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समितीच्या निवडणुकीमध्ये उबाठा व काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यामुळे त्यांच्या महाविकास गटाच्या दाव्यावर विर्जन पडून त्यांना या निवडणुकीत धोबीपछाड व्हावं लागलं ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाली नाही आता हा निवडणूक कार्यक्रम पुन्हा एकदा घेण्यात येणार आहे.
कुडाळ नगरपंचायतीच्या विषय समितीची निवडणूक आचारसंहिता झाल्यानंतर जाहीर करण्यात आली होती ही निवडणूक आज मंगळवार 30 डिसेंबर रोजी कुडाळ नगरपंचायत येथे पीठासीन अधिकारी विनायक औंधकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली या निवडणुकीमध्ये कोणत्या प्रकारे प्रक्रिया होणार आहे हे पिठासीन अधिकारी यांनी सांगितले.
ही निवडणुकीमध्ये गटाच्या तौलनिक संख्येनुसार समिती केल्या जातात. नगरपंचायतीमध्ये जिल्हाधिकारी यांनी मान्यता दिलेले महाविकास आघाडी गट व सिद्धिविनायक गट कार्यरत आहेत या गटाच्या माध्यमातून ही निवडणूक होते.
आज झालेल्या या निवडणुकीमध्ये तौलणि क सदस्य संख्येमध्ये महाविकास आघाडी गटाकडे दोन सदस्यांची तर सिद्धिविनायक गटाकडे एक सदस्याची मागणी पिठासीन अधिकारी यांनी केली मात्र या निवडणुकीत महाविकास आघाडीचे गटनेते मंदार शिरसाट यांनी आपल्याला या निवडणुकीमध्ये सदस्य द्यायचे नसल्याचे स्पष्ट केले तर सिद्धिविनायक गटाचे गटनेते विलास कुडाळकर यांनी दोन सदस्यांची मागणी केली. त्यामुळे तांत्रिक दृष्टिकोनातून ही निवडणूक झाली नाही दरम्यान महाविकास आघाडी गटातील सात नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केला याच प्रवेश कर्त्या नगरसेवकांनी या गटावर आपला अधिकार सांगितला होता मात्र जिल्हाधिकारी यांनी या गटाला मान्यता दिल्या नसल्यामुळे गटनेता मंदार शिरसाट हे कायम राहिले या गटामध्ये उबाठा व काँग्रेसचे नगरसेवक यांचा समावेश आहे त्यामुळे गटावर अधिकार सांगून सुद्धा ते मान्यता प्राप्त नसल्यामुळे त्यांचा अर्ज निकाली काढण्यात आला. महाविकास आघाडीचे गटनेता मंदार शिरसाट यांनी आपल्याला एकही सदस्य द्यायचा नसल्यामुळे ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही आणि भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांच्या स्वप्नावर विर्जन पडले.
पुढील निवडणूक कार्यक्रम महिन्याभरात होणार जाहीर
विषय समिती सभापती व सदस्य निवडीची ही निवडणूक प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्यामुळे हा निवडणूक कार्यक्रम महिन्याभरात पुन्हा घेण्यात येण्याची शक्यता आहे त्यादरम्यान महाविकास आघाडी मधील भाजपमध्ये प्रवेश केलेल्या नगरसेवकांनी आपला स्वतंत्र गट स्थापन करतील अशी शक्यता आहे अन्यथा या गटाचे गटनेते मंदार शिरसाट यांना बदलून दुसऱ्या गटनेत्याची निवड करून त्याला मान्यता मिळवण्याची शक्यता आहे अशी चर्चा कुडाळ नगरपंचायतीमध्ये सुरू होती


