Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळभाजपप्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, कुडाळ आगार अध्यक्षपदी जयेश चिंचळकर 

भाजपप्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, कुडाळ आगार अध्यक्षपदी जयेश चिंचळकर 

कुडाळ | प्रतिनिधी

 

भाजपप्रणित सेवा शक्ती संघर्ष एसटी कर्मचारी संघ, कुडाळ आगाराची मासिक सभा नुकतीच भाजपा कार्यालय कुडाळ येथे पार पडली. या सभेत सन २०२६ ची नूतन कार्यकारिणी स्थापन करण्यात आली. या कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी जयेश चिंचळकर (युवामोर्चा जिल्हा उपाध्यक्ष) यांची एकमताने निवड करण्यात आली. यापूर्वी जयेश चिंचळकर हे कार्यकारिणीत उपाध्यक्ष पदी होते. मात्र, जयेश चिंचळकर यांनी जबाबदारी असताना संघटनेतील कर्मचाऱ्यांचे विविध प्रश्न मार्गी लावल्याने त्यांना वरिष्ठ स्तरावरून संघटनेचे अध्यक्ष पद देण्यात आले आहे.

तर संघटनेच्या उपाध्यक्षपदी शेखर गवंडे, कार्याध्यक्षपदी सुनील बांदेकर (शहरप्रमुख, भाजपा कुडाळ), सचिवपदी समीर कदम यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तसेच सहसचिव विनोद चव्हाण, खजिनदार संजय वरक, सहखजिनदार निलेश कसालकर, प्रसिद्धी सचिव शैलेश धामापूरकर, सल्लागार रुपेश कानडे आणि ऍड. राजीव कुडाळकर, संघटक सचिव संतोष पालव, महिला संघटक वैभवी यसाजी, सदस्य रवींद्र पडोळकर, बाबाजी धुरी, दादासाहेब खंडागळे, विभागीय कार्यकारिणी सदस्य मिथुन बांबुळकर, प्रशांत गावडे, दिनेश शिरवलकर, सोनाली तेरसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!