Saturday, September 26, 2026
No menu items!
Google search engine
No menu items!
Homeताज्या घडामोडीप्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच शिक्षक समितीचे आंदोलन

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या दालनासमोरच शिक्षक समितीचे आंदोलन

*प्रश्नांची निर्गत लागेपर्यंत सातत्यपूर्ण आंदोलन सुरूच राहील*

दर दिवशी एक तालुका आंदोलन करेल. याची प्रशासनाने नोंद घ्यावी. त्याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील – राजन कोरगावकर

ओरोस,7

 

 माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या दालनात दोन महिन्यापूर्वी बैठक होऊन 22 प्रश्नांवर बाबत चर्चा झाली. मात्र अद्याप पर्यंत प्रश्न सोडवण्या संदर्भात 

 

कोणत्याही प्रकारच्या सकारात्मक हालचाली नाहीत. शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार चालू असूण कुणाचं कुणाला सोयरसुतक नाही.

 

 *

. शिक्षण विभागात एजंट नेमले असल्यामुळे त्यांच्या मार्फत आलेले प्रश्नचं निकाली निघतात. हे एजंट अधिकृत नेमले आहेत का ? त्यांना लायसन्स दिले आहे का? ते एकदा अधिकृत जाहीर करावे. 

. निवृत्त झालेले शिक्षक यां वयात सुद्धा जिल्ह्याला येऊन याचना करतात. 

. वर्षानुवर्षे मेडिकल बिलाच्या फाईली टेबलावर मंजुरीसाठी धूळ खात पडल्या आहेत. कॅन्सर ने आजारी लोकांच्या बीलाची मंजुरी देताना सुद्धा वजन कां ठेवावं लागत. काही लोक मृत सुद्धा पावले. तांत्रिक मंजुरी न घेता बिले आयुक्त कार्यालयाला पाठीविली जातात.ऑक्टोबरला परत आलेलं बिल अद्याप पर्यंत संबंधिताना सांगितले जात नाही.    

. दीड वर्ष होऊन गेले तरी जुनी पेन्शनचे प्रस्ताव मंजुरी दिली नाही. 

. जसा अर्थपूर्ण व्यवहार होतो तस २०१९ मध्ये लागलेल्या शिक्षकांचे स्थायी आदेश टप्प्या टप्प्याने मंजुरी आदेश दिले जातात. बाकीचे अर्थपूर्ण व्यवहारासाठी पोचले नाहीत. म्हणून त्यांना स्थायी आदेश दिले नाहीत का ? अशी शन्का आता आमच्या मनात निर्माण झाली आहे.

. सगळे प्रश्न प्रलंबित असताना, फाईलीवर सह्या होत नाही तोपर्यंत शिक्षणाधिकारी यांना कार्यमुक्त करू नये अशी आम्ही आदल्यादिवशी मेल करून मागणी केली. तरी सुद्धा सकाळी सकाळी मोकळे करण्याची घाई कां याच उत्तर आम्हाला मिळेल काय?

. पदवीधर वेतन त्रुटी सर्व जिल्ह्यात कार्यवाही झाली. मग या जिल्ह्यात प्रशासन इतके मठ्ठ कां?

. प्रश्न सुटे पर्यंत आंदोलन सुरूच राहणार. आता आमच्या सहन शिलतेचा अंत झाला आहे.

 श्री विठ्ठल गवस- जिल्हाध्यक्ष 

श्री राजन कोरगावकर- राज्य सरचिटणीस

श्री चंद्रकांत अणावकर –ज्येष्ठ मार्गदर्शक

चंद्रसेन पाताडे- अध्यक्ष प्राथमिक शिक्षक पतपेढी

श्री तुषार आरोसकर- जिल्हा सचिटणीस

 राज्य पदाधिकारी श्री दादा जांभवडेकर ,श्री संतोष परब,श्री राजू वजराटकर,महिला आघाडी जिल्हाध्यक्ष सौ.निकिता ठाकूर सर्व तालुकाध्यक्ष, सरचिटणीस,जिल्हा व तालुका पदाधिकारीप्रशांत मडगावकर सहभागी झाले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!