Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीउपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची भावपूर्ण श्रद्धांजली!*

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाची भावपूर्ण श्रद्धांजली!*

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे अकाली अपघाती निधन ही अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक घटना आहे. त्यांच्या निधनाबद्दल मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाच्या सर्व सदस्यांच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली! 

  मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघाशी अजितदादांचे घनिष्ठ व आपुलकीचे संबंध होते. त्यांना

पत्रकारांच्या प्रश्नांची जाण होती. त्यामुळेच पत्रकारांसाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा होती. मंत्रालयात पत्रकार कक्षासाठी आत्ताची विस्तारीत जागा देण्यात त्यांचा महत्वाचा वाटा होता. 

संघाच्या अनेक सदस्यांचा आरोग्य विमा नसल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यामुळे त्यांचा आरोग्य विमा काढण्याची त्यांची इच्छा होती. अजित पवारांच्या कार्यालयातील अधिकारी सतीश मोघे आणि डॅा. संतोष भोसले त्यासंदर्भात संघाशी संपर्कात होते. अजित पवारांच्या सहकार्याने नुकताच सदस्यांसाठी दंत चिकित्सा कॅम्पही आयोजित करण्यात आला होता.

    त्यांच्या अकाली निधनाने पत्रकारांनी एक आपुलकीचा माणूस तर राज्याने एक उमदे, अभ्यासू, संवेदनशील आणि शिस्तप्रिय नेतृत्व गमावले आहे. त्यांच्या जाण्याने राज्याच्या सार्वजनिक जीवनात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. 

   या दुःखद प्रसंगी त्यांच्या कुटुंबीयांप्रती, आप्तस्वकीयांप्रती वार्ताहर संघ संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. 🙏

 

अध्यक्ष सरचिटणीस

दिलीप सपाटे दीपक भातुसे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!