Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळएकाच बॅलेट युनिटवर होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ..

एकाच बॅलेट युनिटवर होणार जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक ..

पांढऱ्या रंगाची मतपत्रिका जिल्हा परिषदेसाठी तर गुलाबी रंगाची मतपत्रिका पंचायत समितीसाठी 

 

कुडाळ | प्रतिनिधी 

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुका एकाच बॅलेट युनिटवर असणार आहेत यासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका जिल्हा परिषदेसाठी तर गुलाबी रंगाची मतपत्रिका पंचायत समितीसाठी असणार आहे. अशी माहिती कुडाळ तहसीलदार सचिन पाटील यांनी दिली आहे

कुडाळ तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक–2026 करीता शनिवार, दिनांक 7 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळेत मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

सदर निवडणुकीसाठी कुडाळ तालुक्यातील सर्व जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गणांसाठी प्रत्येक मतदान केंद्रावर एकच बॅलेट युनिट (Ballot Unit) वापरण्यात येणार आहे. मतदारांनी या एकाच बॅलेट युनिटवर दोन मते नोंदवायची आहेत. या करिता जिल्हा परिषद मतपत्रिका ही पांढऱ्या रंगाची तर पंचायत समितीची मतपत्रिका ही गुलाबी रंगाची राहील. तर एक मत जिल्हा परिषदसाठी व एक मत पंचायत समिती साठी नोंदवल्याशिवाय मतदान प्रक्रिया पूर्ण होणार नाही. 

मतदारांनी मतदान करताना बॅलेट युनिटवरील चिन्हे व पर्याय काळजीपूर्वक पाहून आपले जिल्हा परिषदेकरिता एक व पंचायत समिती साठी एक असे मतदान करावे. तसेच कोणताही गोंधळ टाळण्यासाठी मतदान कर्मचाऱ्यांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी श्रीम. ऐश्वर्या काळुशे व तहसीलदार श्री. सचिन पाटील यांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!