Thursday, May 7, 2026
Google search engine
Homeताज्या घडामोडीकेंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद

केंद्रीय अर्थसंकल्पात वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गसाठी ३२४४ कोटींची तरतूद

पालकमंत्री नीतेश राणे यांची पत्रकार परिषदेत माहिती

  • मच्छिमार, नारळ, काजू साठीचा मोदी सरकारचा निर्णय कोकणचे अर्थकारण बदलणारा
  • सी-प्लेनमुळे पर्यटनालाही चालना मिळणार 

 

कणकवली :

केंद्रीय अर्थसंकल्पाच्या माध्यमातून कोकणच्या अर्थकारणाला चालना देण्याच्या दृष्टीने महत्वपुर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. यात मच्छिमारांसाठी नविन तलाव, फळ उत्पादनाला व्हॅल्यू क्रॉपचा दर्जा देण्यात आला आहे. नारळ उत्पादनाच्या दृष्टीने नारळ प्रोत्साहन योजना, काजूला जागतिक स्तरावर पोहोचविण्याच्या दृष्टीने प्रीमियम ब्रँड रुपांतरीत करण्यात येणार आहे. तसेच महत्वाचे म्हणजे वैभववाडी-कोल्हापूर रेल्वेमार्गा साठी ६५०० कोटीच्या खर्चा पैकी या अर्थसंकल्पात केंद्र शासनाने ३२४४ कोटींची तरतूद केली आहे. उर्वरीत ५० टक्के निधी राज्य शासन देणार असल्याने हा रेल्वेमार्ग साकारण्याचा विषय मार्गी लागला असल्याची माहिती मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नीतेश राणे यांनी दिली.

    येथील ओमगणेश निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना श्री. राणे म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात असलेल्या केंद्र सरकारने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या माध्यमातून आपल्या कोकणासाठी आपल्या सिंधुदुर्गच्या विकासासाठी या मोठ्या प्रमाणामध्ये चालना दिलेली आहे. आपले खासदार नारायण राणे ज्या सरकारचे प्रतिनिधित्व करतात त्या सरकारच्या माध्यमातून कोकणासाठी अर्थकारणाला चालना कशी दिली जाते हे सांगण्यासाठी आपण मुद्दाम ही पत्रकार परिषद घेत असल्याचे श्री. राणे म्हणाले.

या अर्थसंकल्पात प्रामुख्याने आपल्या कोकणाच्या अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून मच्छीमार, नारळ, काजू उत्पादनासाठी मोठ्या प्रमाणामध्ये निर्णय घेण्यात आलेले आहेत. ज्याच्यावर आपला कोकणाचे अर्थकारण अवलंबून आहे. या तिन्ही क्षेत्रांच्या माध्यमातून चालना देताना निधीची तरतूद करणं म्हणजे आपल्या जनतेचे दरडोई उत्पन्न वाढवण्याच्या दृष्टिकोनातून अतिशय योग्य निर्णय आहे. मच्छीमाराला प्रोत्साहन देण्यासाठी ५०० नवीन तलावांची अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. याचाच अर्थ मच्छिमारांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आपल्या कोकणाच्या किनारपट्टीवरील मच्च्मिारांना याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. किनारपट्टीच्या भागांमध्ये स्टार्टअप, महिलांचा गट व मत्स्य उत्पादक शेतकऱ्यांच्या संघटना याची साखळी बळकट करण्यात येणार आहे. खोल समुद्रात पकडलेले मासे आता करमुक्त मुक्त करण आणि हे विदेशात पाठविण्यासाठी निर्यात माल समजले जाईल अशा पद्धतीचे अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. ज्यामुळे आपल्या मच्छिमारीला अर्थाने चालला मिळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे.

कोकणात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या फळ उत्पादनाला व्हॅल्यू क्रॉपचा दर्जा दिलेला आहे. या निर्णयामुळे आपल्या कोकणामध्ये शेती क्षेत्राला चालना मिळणार आहे. आपल्याकडे बऱ्यापैकी अर्थकारण नारळावर अवलंबून असतं. सिंधुदुर्ग सारख्या जिल्हयात नारळ उत्पादनाला फार मोठ्या प्रमाणामध्ये स्कोप आहे. त्यासाठी कोकण कोकणातील नारळ भागातील पुनर्जीवित करण्यासाठी नारळ संवर्धन योजना आणण्यात आली आहे. अर्थसंकल्पामध्ये घेतलेला निर्णय हा थेट आपल्या सिंधुदुर्ग रत्नागिरी रायगडच्या अर्थकारणाला मोठ्या प्रमाणामध्ये चालना देणारा असल्याचे श्री. राणे म्हणाले.

मध्यंतरी मंत्रालयाचा बंदर विकास मंत्रालयाचा आढावा घेतला तेव्हा कोल्हापूर वैभववाडी रेल्वेमामार्गबाबत चर्चा व निर्णय झाला होता. यावेळी मुख्यमंत्र्यांनी ५० टक्के खर्च राज्य शासन उचलणार असल्याचे सांगितले होते. मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक पद्धतीने या प्रकल्पाला लागणारे ६५०० कोटी पैकी निम्मा खर्च केंद्र सरकार करेल उर्वरित अर्ज सरकार करेल हा जो निर्णय घेतला त्याची अंमलबजावणी या अर्थसंकल्पांना होत असताना आपल्याला दिसते. कालच्या अर्थसंकल्पामध्ये ३२४४ कोटीची तरतूद कोल्हापूर-वैभववाडी रेल्वमार्गासाठी झालेली आहे. उर्वरीत राज्य सरकार रेल्वे बोर्डच्या माध्यमातून देणार आहोत. म्हणून त्याची भूसंपादनाची प्रक्रिया जी आम्ही ऑलरेडी त्याची सुरू केलेली आहे त्याला मोठ्या प्रमाणामध्ये चालना या कालच्या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून मिळणार आहे. २०२८ पर्यंत हा प्रकल्प पूर्ण करण्याचा आमचा माणस आहे. त्या दृष्टिकोनातून आम्हाला मुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांनी काम करण्याची पूर्ण आदेश आणि स्वातंत्र्य आम्हाला दिलेला आहे. आचारसंहिता सुरू होण्याअगोदर मी कोल्हापूर कलेक्टर आणि सिंधुदुर्ग कलेक्टर आणि राज्याचा रेल्वे बोर्ड त्याबरोबर व्हीसीच्या माध्यमातून बैठकीही घेतली होती, असेही श्री. राणे म्हणाले. निवडणूकीनंतर भूसंपादनाची प – क्रिया आम्ही सुरू करून मोठ्या प्रमाणामध्ये या प्रकल्पाला चालना देण्याची आमची पूर्णपणे तयारी असल्याचे त्यांनी सांगितले.

अर्थसंकल्पामध्ये काल भेटलेली बंदर आणि जहाज बांधणीच्या क्षेत्रामध्ये पण त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये तरतूद करून दिलेली आहे. त्यातून आपल्याकडे पर्यटनाला चालला मिळू शकते. तसेच सी-प्लेन योजना सुरू करण्याच्या घेतलेल्या निर्णयाचा थेट इम्पॅक्ट कोकणातला किनारपट्टीच्या भागांमध्ये दसिणार आहे. भविष्यामध्ये जलवाहतूक असेल पर्यटनासाठी असेल जसं मालदिव आणि अन्य सिंगापूर सारख्या अन्य देशात मोठ्या प्रमाणामध्ये दिसतो तसंच याही क्षेत्रांमध्ये सी- प्लेनच्या स्वदेशी निर्मितीमुळे केवळ प्रवास सुलभ होणार नाही तर दुर्गम भागातील पर्यटनाला ही मोठी कलाटणी मिळणार असल्याचे श्री. राणे म्हणाले.

आम्ही लोकसभेमध्ये आग्रह करत होतो की आपल्याला एक ताकदीचा लोप्रतितिधी निवडून द्यायचा आहे. त्यानुसार आपण माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना निवडून दिले त्याच्या किती मोठा फायदा आपल्याला केंद्र सरकारच्या माध्यमातून झाला हे दिसत आहे. केंद्र व राज्य सरकारच्या सत्तेच्या माध्यमातून पहिल्या एक वर्षांमध्ये दिसत आहे. आता पुढची चार वर्षे आम्हाला हे सगळ्यांच्या अंमलबजावणी करण्यासाठी भरपूर वेळ आहे. येणाऱ्या चार वर्षांमध्ये कोकणचा कायापालट झालेला निश्चित दिसेल असेही श्री. राणे म्हणाले.

*कोणत्याही अपक्षाना आमचा पाठींबा नाही*

या जि.प., पं.स. निवडणूकीत आम्ही महायुती म्हणून लढत आहोत. त्यामुळे कोणत्याही अपक्षाना आमचा पाठींबा नाही. जिल्ह्याच्या तिजोरीच्या चाव्या आमच्याकडे आहेत. सेना भाजपाचे सोडून चुकून कोण निवडून आला तर एक रुपयाचाही निधी मिळणार नाही. अपक्षाना मत देऊन आपले मत वाया घालवू नका, असेही श्री. राणे म्हणाले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!