आकर्षक फुलांची आरास
मंदिर परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई
मालवण ,8
आंगणेवाडी येथील भराडीमातेच्या दर्शनाची आस लाखो भक्तगणांना लागली आहे. अजूनही हाकेला धावणाऱ्या, नवसाला पावणाऱ्या व भवानीचे रुप असलेल्या भराडी मातेच्या दर्शनासाठी मंत्री,खासदार, आमदार, सर्व राजकीय पक्षाचे नेते, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच सेलिब्रिटी यांसह विविध धार्मिक, क्रीडा , सांस्कृतिक आणि सामाजिक, क्षेत्रातील महनीय व्यक्ती येणार असल्याने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. गेले अनेक दिवस सुरु असलेली तयारी आंगणेवाडी कुटुंबीय, जिल्हा प्रशासन यानी पूर्ण केली आहे. एकूणच भराडी देवीचे भक्त व चाकरमान्यानी आंगणेवाडी व परिसर गजबजुन गेला आहे.
अनन्य असाधारण महत्व या यात्रोत्वाला प्राप्त झाले आहे. आजच्या यात्रोत्सवाच्या निमीत्ताने सुवर्ण अलंकाराने भरजरी साडी नेसवून मातेला साजशृंगाराने सजविण्यात आले आहे. आजच्या दिनी मातेचे तेजोमय मनोहारी रुप पाहून मातेचे भाविक सुखावणार आहेत. गाभाऱ्यामध्ये ओट्या भरण्यासाठी शिस्तबध्द नियोजन आंगणे कुटुंबियांच्या वतीने करण्यात आले आहे. सभामंडप व गाभाऱ्याचे रंगरुप फुलांच्या सजावटीने अवर्णनिय नयनरम्य आणि मनमोहक वाटत असल्याने भक्तांसाठी नंदनवनाची अनुभूती निश्चित जाणवणार एवढ निश्चीत आहे.
यात्रोत्सवास ओट्या भरण्यास पहाटे ३ वाजता प्रारंभ होणार आहे. आकर्षक विद्युत रोषणाईने परिसर सजविण्यात आला आहे. यात्रा परिसरातील मालवण, मसुरे व कणकवली बस स्टँड नजिक इतर वाहनांची पार्कींग व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मंदिर व मंदिर परिसरात ३५ पेक्षा जास्त ठिकाणी क्लोज सर्किट कॅमेरे लावण्यात आले आहेत. यांनी दिली विज वितरण कंपनीने सुध्दा अखंडीत विज पुरवठ्यासाठी खबरदारी घेतली आहे. कोणताही गैर प्रकार घडू नये यासाठी जिल्हा पोलीस प्रमूख …. यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस दल कार्यरत असणार आहेत
रात्री ९.ते १२ या वेळेत धार्मिक विधीसाठी ओट्या भरण्याचा कार्यक्रम बंद असणार तदनंतर लगेचच १ वाजता पूर्ववत दर्शन खुले होणार असल्याची माहिती अध्यक्ष छोटू आंगणे यांनी दिली.महनीय व्यक्तींसाठी मुख्य स्वागत कक्षा लगतच खास व्यवस्था करण्यात आली आहे. देवीचे दर्शन सुलभ व्हावे यासाठी दहा रांगांमधुन व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अर्ध्या अर्ध्या तासाने दर्शन मिळणार आहे. सर्व भाविकानी संयम व शिस्त बाळगुन देवीचे दर्शन रांगेतूनच घेण्याचे आवाहन आंगणे कुटुंबीय आंगणेवाडी यानी केले आहे.
दक्षिण कोकणची काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवाची तय्यारी पूर्ण झाली आहे. आज सोमवार दिनांक ९ फेब्रुवारी रोजी पहाटे ३ वाजता यात्रेस सुरुवात होणार आहे. मंगळावर दिनांक १० फेब्रुवारी पर्यंत यात्रोत्सव दोन दिवस चालणार आहे. यात्रोत्सवा निमित्त देवालयाच्या परिसरात दर्शन रांग व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे.
गेल्या महिनाभर आंगणेवाडी यात्रेच्या तयारीत गुंतलेल्या ग्रामस्था, प्रशासनाने सर्व तय्यारी पूर्ण केली असून आंगणेवाडी गावात येणारे मालवण व कणकवली हे मार्ग सतर्क सुरक्षित आहेत. त्यामुळे यात्रा काळात नियमांचे काटेकोर पालन केले जाईल. देवालयाच्या परिसरात दर्शन रांग व्यवस्था पूर्ण करण्यात आली असून संपूर्ण मंदिरात विविध रंगीबेरंगी फुलांची आरास करण्यात आली आहे. तसेच देवालय परिसर आकर्षक विद्युत रोषणाईने झळाळून गेला आहे.
आंगणेवाडी येथील पाणी शुद्धीकरण पूर्ण करण्यात आले आहे अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे. विद्युत पुरवठा, महामंडळाच्या बस सेवा, पाणी पुरवठा यासारख्या सोई मुबलक आहेत. यावर्षी प्रथमच मंडळाकडून यात्रा परिसरातील कणकवली व मालवण बस स्टँड ते मंदिर पर्यंत अपंगांसाठी रिक्षा आणि व्हीलचेअरची सोय उपलब्ध आहे. त्याचा वापर भाविकांना घेता येईल. पोलीस विभागाने सुद्धा बंदोबस्त कडक केला असून जिल्हा पोलिस प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली २० पेक्षा जास्त अधिकारी, १५० पेक्षा अधिक पोलिस , १ बॉम्ब नाशक पथक, १ आरसिपी पथक तैनात असणार आहे. प्रवेश मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात असणार असल्याची माहिती मालवण पोलीस निरीक्षक यांनी दिली आहे.
याहीवर्षी परिसर दुकानांनी गजबजला आहे…..!
मेवा मिठाईच्या दुकानांची रांगच रांग आह. इतरही गृहपयोगी वस्तूंची दुकाने थाटली आहेत. बच्चे कंपनीला खेलाण्यांची दुकाने मोठ्या प्रमाणावर दाखल झाली आहेत. तसेच आकाश पाळणा फनी गेम इत्यादी करमणुकीची साधने दिसत आहेत.
आंगणे कुटुंबीय आणि प्रशासनाने यात्रा प्लास्टिक मुक्त करण्याचा संकल्प केला असून त्यासाठी दुकानदार आणि भाविक ग्राहक यांनी पूर्णपणे सहकार्य करावे असे आवाहन करण्यात आले आहे


