कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे रेल्वे ट्रॅकवर रेल्वे धडकेमध्ये मृत्यू पावलेल्या इसमाची ओळख पटली असून पिंगुळी चिंदरकरवाडी येथील श्रीकृष्ण कोकाटे (वय ४७) असे असून त्याने आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
पिंगुळी रेल्वे ट्रॅकवर काल (शनिवारी) रत्नागिरी येथे जाणाऱ्या मालवाहू रेल्वेची धडक बसून एका इसमाचा मृत्यू झाला होता ही आत्महत्या होती की अपघात याबाबत पोलीस तपास करत असताना हा अज्ञात इसम पिंगुळी चिंदरकरवाडी येथील असल्याचे निष्पन्न झाले चिंदरकरवाडी येथील वाहनांना रंगकाम करणारा श्रीकृष्ण कोकाटे असे त्याचे नाव असून त्याने आत्महत्या केल्याचे उघड झाले आहे.


