Sunday, June 21, 2026
Google search engine
Homeआपलं कुडाळकुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने थरार उडविला...

कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने थरार उडविला…

कुडाळ | प्रतिनिधी 

      कुडाळ शहरातील पोस्ट ऑफिस चौक येथे आज सकाळी १०.५० वाजताच्या सुमारास चालकाचे नियंत्रण सुटलेल्या कारने थरार उडविला. सदर कारने मुख्य रस्त्यावर गोल फिरत रस्त्यावर असलेल्या दुचाकीला ठोकर देत, नंतर उभ्या असलेल्या दुस-या कारला जोरदार धडक दिली. या घटनेने तेथील पादचारी नागरिक तसेच विक्रेत्यांची पळापळ झाली. या चौकात मोठ्या प्रमाणात वाहनांची तसेच नागरिकांची रहदारी असते. मात्र सुदैवाने मोठा अनर्थ टळला. या अपघातात दोन्ही कारचे नुकसान झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!