कुडाळ | प्रतिनिधी
कुडाळ-वेंगुर्ले मार्गावरील वाडीवरवडे येथे आज दुपारी ३.३० च्या सुमारास एसटी आणि दुचाकी यांच्यात अपघात झाला. या अपघातात दुचाकीवरील तरुणीच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. प्राप्त माहितीनुसार, कुडाळ आगारातून दुपारी ३ वाजता सुटलेली कुडाळ मठ वेंगुर्ला (एम एच १४ बी टी ४९३२) ही एसटी बस वाडीवरवडे येथे आली असता मागून येणाऱ्या दुचाकीची बसला मागून धडक बसली. यामध्ये दुचाकीवरील तरुणीच्या पायाला दुखापत झाली आहे. तिला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले आहे.


